शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी महिलांचा खामगाव पालिकेवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 12:22 IST

पाण्या अभावी संतप्त झालेल्या बाळापूर फैलातील महिलांनी शुक्रवारी सकाळीच पालिकेवर धडक दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव:  गत तीन महिन्यांपासून तीव्र पाणी टंचाईचे चटके सोसणाºया नागरिकांच्या भावनांचा आता उद्रेक होत असल्याचे दिसून येते. पाण्या अभावी संतप्त झालेल्या बाळापूर फैलातील महिलांनी शुक्रवारी सकाळीच पालिकेवर धडक दिली. यावेळी पालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी विलंबाने पोहोचल्याचा तीव्र संतापही नागरिकांनी व्यक्त केला.पाणी पुरवठा योजनेतील तांत्रिक बिघाड आणि आकस्मिक समस्यांमुळे गत तीन महिन्यांपासून शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत आहे. त्यामुळे  शहराच्या अनेक  भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो. नळाची पाईपलाईन नसलेल्या भागात टँकरने पाणी पुरवठा करावा, तसेच नळ नियमित सोडावे यामागणीसाठी शुक्रवारी बाळापूर फैल, लक्कड गंज भागातील महिलांनी  पालिकेत धडक दिली. यावेळी पालिकेतील अधिकारी अनुपस्थित असल्यामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.  पालिकेच्या विहिरीवरून टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची मागणीही यावेळी काही महिलांनी लावून धरली. 

टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी!शहरात नियमित नळ सोडण्यात यावे, पाणी पुरवठा योजनेत तांत्रिक बिघाड झाल्याच्या कालावधीत टँकरने संपूर्ण शहरात पाणी पुरवठा करण्यात यावा. शहरातील हातपंपांची युध्दपातळीवर दुरूस्ती करण्यात यावी, अशा विविध मागण्या यावेळी लावून धरण्यात आल्या. पाणी पुरवठा अभियंता प्राजक्ता पांडे, पर्यवेक्षक सुरजसिंह ठाकूर आणि पाणी पुरवठा विभागातील अधिकारी आणि कर्मचाºयांनी नागरिकांची समजूत काढून, वेळेवर पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर हा मोर्चा विसर्जीत झाला.(प्रतिनिधी)

टॅग्स :khamgaonखामगावwater scarcityपाणी टंचाईagitationआंदोलन