घरकुलासाठी आसलगावच्या महिलांची तहसिलवर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 15:29 IST2020-01-10T15:29:50+5:302020-01-10T15:29:55+5:30
महिलांनी तहसिलदार यांना निवेदन देऊन कायमस्वरूपी जागेचे पट्टे देण्यात यावे व शासकीय योजनांचा लाभ मिळावा अशी मागणी केली.

घरकुलासाठी आसलगावच्या महिलांची तहसिलवर धडक
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगांव जामोद : तालुक्यातील आसलगाव येथील महिलांनी घरकुलासाठी तहसिल कार्यालवायर ९ जानेवारीरोजी सकाळी ११ वाजता मोर्चा काढला. आसलगाव येथील भुमिहीन बेघर कुटुंब अनेक वर्षा पासुन शासकिय जागेवर राहत असुन ग्रामपंचायत मध्ये नोंद नसल्याने शासकीय घरकुल योजनेचा लाभ त्यांना मिळत नाही. तरी ग्रा.प. दप्तरी नोंद करुन घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा या मागणीसाठी ९ जानेवारी रोजी शेकडो महिलांचा मोर्चा तहसिलवर धडकला. महिलांनी तहसिलदार यांना निवेदन देऊन कायमस्वरूपी जागेचे पट्टे देण्यात यावे व शासकीय योजनांचा लाभ मिळावा अशी मागणी केली.
आसलगांव येथील शेकडो कुटुंबांना शासकीय झोपडपट्टी चाळीस वर्षो पुरवी मिळाल्या आहेत. परंतु ज्या नावे जागा मिळाल्या ते आज रोजी मयत असल्याने वारस नावे आलेले घरकुल चा लाभ ग्रामसेवक देत नाही. मयत झालेल्या नावे असलेली जागा वारसाची नोंद व शासकीय भूखंडावर असलेले अतिक्रमण ग्रामपंचायत दप्तरी नोंद घेण्याची सुचना देवुन आम्हाला घरकुल लाभ देण्यात आला पाहिजे. यासाठी वारंवार मागणी ग्रामपंचायतीकडे सुद्धा करण्यात आली आहे तर तशा पद्धतीचे निवेदन २८ डिसेंबर रोजी आसलगाव येथील ग्रामपंचायतीला सुद्धा देण्यात आलेले आहे. आणि आज तीच मागणी तहसीलदार यांच्याकडे सुशिलाबाई रावणचवरे, निर्मलाबाई सुलताने, संगीताबाई वसतकार, सुमन सुलताने, सुमन हिवराळे, प्रमिलाबाई मुंडले, तुळसाबाई मेसरे, रेखा श्रीनाथ, दुर्गा उगले, बनाबाई बावणे ,संगीता मेसरे, लक्ष्मी भातुरकर ,राजूसाबाई गव्हाळे ,गंगुबाई श्रीनाथ, बाळू श्रीनाथ ,कल्पना कवरे यांच्यासह महिलांनी केली. (प्रतिनिधी)