दारूबंदीसाठी सरसावल्या महिला

By Admin | Updated: March 15, 2015 00:11 IST2015-03-14T23:58:08+5:302015-03-15T00:11:09+5:30

वैरागड येथील महिलांनी अमडापूर पोलीस ठाण्यात दिली तक्रार.

Women who want to be drunk | दारूबंदीसाठी सरसावल्या महिला

दारूबंदीसाठी सरसावल्या महिला

चिखली (जि. बुलडाणा ): तालुक्यातील वैरागड गावात विकल्या जाणार्‍या अवैध दारूमुळे महिलांच्या अस्मितेला धोका पोहोचतोय. शिवाय गावातील अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. वैरागड येथील महिलांनी या विरोधात एकत्र येत गावातील अवैध दारूविक्रीला लगाम लावावा व संपूर्ण दारूबंदी करावी, अशी मागणी शनिवारी ठाणेदार मेङ्म्राम यांच्याकडे केली.
तालुक्यातील वैरागड येथे अवैध दारूविक्री होत असल्यामुळे काही महिलांचे पती व किशोरवयीन मुले व्यसनाधीन झाली आहेत. शिवाय दारू पिऊन महिलांना मारहाण करण्याच्या घटना तसेच कौटुंबिक अत्याचार वाढले असून, गावातील लग्नसमारंभ व इतर सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये भांडण-तंटे वाढले आहेत. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे, गावातील दारूड्यांमुळे सार्वजनिक ठिकाणी महिलांची अस्मिता धोक्यात आली आहे. दारूविक्रेत्यांवर कोणाचाही वचक नसल्यामुळे राजरोसपणे दारू विकली जात असल्याचा आरोप महिलांनी केला आहे. दारूड्या पतींकडून महिलांना होणार्‍या त्रासातून मुक्त करण्यासाठी पोलीस प्रशासनाने सहकार्य करावे व गावात संपूर्ण दारूबंदी घोषित ्रकरावी, अशी मागणी उपस्थित महिलांनी निवेदनातून केली आहे.

Web Title: Women who want to be drunk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.