उपचाराअभावी महिला दगावली

By Admin | Updated: June 16, 2014 00:52 IST2014-06-15T23:18:12+5:302014-06-16T00:52:43+5:30

देऊळगाव कुंडपाळ येथील सर्पदंश केलेल्या महिलेस ग्रामीण रुग्णालयात वेळेवर उपचार न मिळाल्याने जीव गमवावा लागल्याची

Women used to get treatment | उपचाराअभावी महिला दगावली

उपचाराअभावी महिला दगावली

लोणार : तालुक्यातील देऊळगाव कुंडपाळ येथील सर्पदंश केलेल्या महिलेस ग्रामीण रुग्णालयात वेळेवर उपचार न मिळाल्याने जीव गमवावा लागल्याची घटना १४ जून रोजी घडली. तालुक्यातील देऊळगाव कुंडपाळ येथील सुरेखा खरात ही सकाळी ४ वाजता उठल्यानंतर घरातील झाडझुड करीत असताना अंगणात ठेवलेले टोपले उचलण्यासाठी चुलीजवळ गेली. त्याठिकाणी असलेल्या विषारी सापाने तिच्या हाताला चावा घेतला. यामुळे त्यांना अस्वस्थपणा जाणवू लागला. तेव्हा घरच्यांनी प्राथमिक उपचारासाठी स्थानिक ग्रामीण रुग्णालयात आणले; मात्र रुग्णालयातील गाढ झोपेत असलेल्या कर्मचार्‍यांनी सदर महिलेवर उपचार करण्यास टाळाटाळ करुन सर्पदंशावर उपायकारक लस आमच्याकडे नसल्याचे सांगितले. त्यानंतर तुम्ही रुग्णाला मेहकरला घेऊन जा, असे सांगून रुग्णालयातून परत पाठविले. सदर महिलेला मेहकर येथील रुग्णालयात दाखल करुन अर्धातास उपचार केल्यानंतरही महिलेचा मृत्यू झाला.

Web Title: Women used to get treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.