दारुबंदीसाठी महिला सरसावल्या!

By Admin | Updated: December 5, 2015 09:09 IST2015-12-05T09:09:01+5:302015-12-05T09:09:01+5:30

लोणार तालुक्यातील पांग्रा डोळे येथील महिलांनी दिले संपूर्ण दारूबंदीसाठी निवेदन.

Women for liquor ban! | दारुबंदीसाठी महिला सरसावल्या!

दारुबंदीसाठी महिला सरसावल्या!

लोणार : तालुक्यातील पांग्रा डोळे येथे दारुबंदी करण्यात यावी, यासाठी पांग्राडोळे येथील महिलांनी २ डिसेंबरला लोणार पोलीस स्टेशनकडे निवेदन दिले व त्यानंतर ४ डिसेंबरला पांग्राडोळे येथील ग्रामपंचायत सर पंच, सदस्य व महिलांनी दारुबंदीच्या ठरावासाठी बैठक घेतली. पांग्राडोळे येथे कायमस्वरूपी दारूबंदी करण्यात यावी, अशी मागणी पांग्राडोळे येथील महिलांनी २ डिसेंबरला लोणार पोलीस स्टेशनकडे निवेदनाद्वारे केली. त्यानंतर ४ डिसेंबर रोजी यावर ग्रामस्थांच्या एकजुटीने महिलांनी पुढाकार घेऊन गावात बैठकीचे आयोजन केले. या बैठकीला ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, तंटामुक्ती, युवक व बहुसंख्य महिलांची उपस्थिती होती. महिलांसोबत गावकर्‍यांनीही दारुबंदीसाठी सहभाग घ्यावा, असे आवाहन सरपंचपती नवृत्ती किसन नरवाडे यांनी यावेळी केले. दारुबंदी झाल्याशिवाय महिला स्वस्थ बसणार नाहीत, असा इशारा यशोदा सीताराम डोळे यांनी यावेळी दिला. गंगुबाई विठ्ठल डोळे, गोदावरी संतोष डोळे, मुक्ता ज्ञानेश्‍वर कुकडे, मंगल पंढरी डोळे, शशिकला चौघुले, प्रयाग विश्‍वनाथ कांगणे, रंजना समाधान डोळे, विमल ज्ञानबा डोळे, सविता भिकाजी डोळे, जिजाबाई पंढरी डोळे, लता सुनील डोळे, सुनिता अशोक कांगणे या महिलांनी पुढाकार घेऊन या बैठकीचे आयोजन केले व दारुबंदीसाठी महिलांसह ग्रामस्थांमध्ये जनजागृती केली.

Web Title: Women for liquor ban!