टॅक्सीतून पडल्याने धानोरा येथील महिला ठार
By Admin | Updated: December 10, 2014 00:18 IST2014-12-10T00:18:10+5:302014-12-10T00:18:10+5:30
काळीपिवळी टॅक्सीतून पडून दुर्देवी मृत्यू ; राष्ट्रीय महामार्गावर घडला अपघात.

टॅक्सीतून पडल्याने धानोरा येथील महिला ठार
मलकापूर (बुलडाणा) : अवघ्या पाच दिवसांवर येवून ठेपलेल्या मुलाच्या लग्नानिमीत्त दागिने खरेदी करण्यासाठी आलेल्या महिलेचा घराकडे परतत असताना काळीपिवळी टॅक्सीतून पडून दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना आज ९ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजेदरम्यान नांदुरा रोडवरील मुंधडा पेट्रोलपंपाजवळ राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वर घडली. धानोरा (विटाळी) येथील सौ.सिंधुबाई विठ्ठल काटे (वय ४0) ही तिच्या मुलाच्या १५ डिसेंबर रोजी होणार्या लग्नासाठीचे दागिने खरेदी करण्यासाठी मलकापूर येथे आली होती. दागिने व लग्नाचे साहित्य खरेदी करुन ती घराकडे काळीपिवळी टॅक्सी क्र.एम.एच.२९-२८५१ या गाडीने निघाली. मलकापूर शहराबाहेरील राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वरील मुंधडा पेट्रोलपंपासमोर ती धावत्या काळीपिवळीतून रोडवर पडल्याने डोक्याला गंभीर मार लागला. उपचारार्थ मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारापूर्वीच सदर महिलेची प्राणज्योत मावळली. ऐन पाच दिवसावर आलेल्या लग्नकार्यावर या दुदैवी मृत्यूमुळे शोककळा पसरली आहे.