रानडुकराच्या हल्ल्यात महिला जखमी
By Admin | Updated: July 17, 2014 23:58 IST2014-07-17T23:02:57+5:302014-07-17T23:58:45+5:30
दुधलगाव बु. येथील शेतमजूर महिला रानडुकराच्या हल्ल्यात जखमी.

रानडुकराच्या हल्ल्यात महिला जखमी
दुधलगाव बु. : रानडुकराच्या हल्ल्यात शेतमजूर महिला जखमी झाली. ही घटना येथे १२ जुलै रोजी घडली. येथील सुरेश हरी गावंडे हे पत्नी कल्पना सुरेश गावंडे यांना सोबत घेऊन १२ जुलै रोजी शेतामध्ये मका व कपाशी लागवड करण्याकरिता गेले असता, कल्पना गावंडे या लागवड करीत होत्या. यावेळी रानडुकराने कल्पना गावंडे यांना चावा घेऊन जखमी केले. त्यामुळे त्यांना उपचारासाठी मलकापूर येथील खासगी दवाखान्यात भरती केले होते. सध्या दुधलगावसह परिसरातील शेतशिवारात वन्य प्राण्यांनी कहर केला आहे. यामुळे शेतकरी वर्ग धास्तावलेला दिसून येत आहे. आधीच शेतकर्यांना दुबार पेरण्या कराव्या लागल्या. त्यात वन्यप्राण्यांकडून पिकाचे नुकसान होत आहे. त्यातच वन्यप्राण्यांकडून हल्ल्याच्या घटना घडत आहेत. शेतकर्यांना रात्री-बेरात्री शेतात कपाशी पिकांना पाणी देण्यासाठी जावे लागते. तेव्हा या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील शेतकर्यांकडून होत आहे.