बसखाली आल्याने महिला जखमी
By Admin | Updated: August 25, 2014 02:24 IST2014-08-25T02:02:10+5:302014-08-25T02:24:19+5:30
बुलडाणा बसस्थानकात बसच्या पुढील चाकात आल्याने एक महिला गंभीर जखमी.

बसखाली आल्याने महिला जखमी
बुलडाणा : स्थानिक बसस्थानकात दाखल होत असलेल्या बसच्या पुढील चाकात आल्याने एक महिला गंभीर जखमी झाली. तर सोबतचा तीन वर्षीय बालक सुदैवाने बचावला. ही घटना आज २४ ऑगस्टच्या दुपारी घडली.
अमरावती येथील माधुरी तरोडे (३0) या जळगाव (खान्देश) जिल्ह्यातील ग्राम कुरा काकोडा येथील प्राथमिक स्वास्थ केंद्रात नर्स आहे. काही कामानिमित्त माधुरी तरोडे या आज आपल्या तीन वर्षीय बालकासह बुलडाणा बसस्थानकावर उतरल्या. याच दरम्यान मलकापूर-बुलडाणा बस क्रमांक एमएच ४0 एन ८४३५ ही बसस्थानकात येत होती. बसस्थानकातून बाहेर निघताना माधुरी तरोडे अचानक बसच्या समोरच्या चाकात आल्या. यात त्या गंभीर जखमी झाल्या.
तर त्यांच्या कडेवर असलेल्या तीन वर्षीय बालकाला सुदैवाने काही झाले नाही. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.