दारु बंदीसाठी महिला सरसावल्या
By Admin | Updated: July 7, 2014 22:39 IST2014-07-07T22:39:14+5:302014-07-07T22:39:14+5:30
चौथा गावात अवैध दारु विक्रीचा महापुर सुरू आहे.

दारु बंदीसाठी महिला सरसावल्या
गिरडा : चौथा गावात अवैध दारु विक्रीचा महापुर सुरू आहे.व्यसनाधीन होऊन आतापर्यंंत गावातील ७ युवकांचा बळी गेला आहे. आता हे थांबवा अन्यथा नारीशक्ती रस्त्यावर उतरेल असा ईशारा देत येथील महिला गावकर्यांना धारेवर धरले.अखेर सरपंचपती गजानन नप्ते, पोलिस पाटील किसन नप्ते व तंटामुक्तीचे अध्यक्ष रामराव गायकवाड यांनी तातडीने ग्रमासभा बोलावली. यापुढे चौथा गावात एकही दारु विक्रीचे दुकान दिसनार नाही. तसेच गावात कोणीही दारु आणून विक्री करणार नाही असा ठराव घेतला. दरम्यान उपस्थित महिलांनी यावेळी प्रचंड आरोप केले. दारू पिऊन चौकात उभे राहुन दारूडे महिलांना शिवीगाळ करतात. तसेच दारूच्या नशेत केव्हाही धार्मीक स्थाळाची विटंबना होऊ शकते. तेव्हा यापुढे गावात दारु विक्री करणारा कोणी आढळल्यास त्याची धुलाई महिलांच्या हस्ते होईल असा इशाराही महिलांनी दिला. दरम्यान यावेळी गावकर्यांनी पोलिसांनाही पाचारण केले होते. त्यानुसार ठाणेदार सुनिल जाधव, बीट जमादार विजय पवार उपस्थित होते. त्यांनीही गावात कोणी दारु विक्री करताना आढळल्यास तक्रार करा त्याच्यावर कारवाई करू असे आश्वासन दिले.या ठरावाच्या प्रतिसह एक निवेदन महिलांनी पोलीस अधिकार्यांना दिले.