लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 00:16 IST2017-08-09T00:15:48+5:302017-08-09T00:16:44+5:30
नांदुरा: परराज्यातील एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिला नांदुरा येथे आणून अत्याचार केल्याच्या तक्रारीवरुन नांदुरा पोलीसांनी तात्काळ आरोपीला अटक केली. तर न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदुरा: परराज्यातील एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिला  नांदुरा येथे आणून अत्याचार केल्याच्या तक्रारीवरुन नांदुरा पोलीसांनी  तात्काळ आरोपीला अटक केली. तर न्यायालयाने त्याला एक  दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
नांदुरा शहरातील वार्ड नंबर १४ मधील आरोपी प्रविण शालीग्राम  वाकोडे (वय ३६ वर्षे) याने परराज्यातील एका महिलेला नांदुरा येथे  लग्नाचे आमिष दाखवून स्वताच्या राहत्या घरी आणले व २३ ते २५  जुलै दरम्यान तिच्यावर अत्याचार केला. याबाबत पीडित महिलेने  नांदुरा पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. यावरुन नांदुरा पोलीसांनी गुन्हा  दाखल करुन तात्काळ आरोपीस अटक केली असून न्यायालयासमोर  हजर केले असता त्याला एक दिवसाची पोलिस  कोठडी सुनावण्यात  आली आहे. 
पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी बोबडे व ठाणेदार  विलास पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक कांडुरे व पोका  रविंद्र हजारे करीत आहेत.