मलकापुरातील महिलेचा स्वाइन फ्लूने मृत्यू
By Admin | Updated: April 28, 2017 00:35 IST2017-04-28T00:35:52+5:302017-04-28T00:35:52+5:30
मलकापूर : शहरातील एका ४३ वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लू या संसर्गजन्य आजाराने एमआयटी हॉस्पीटल औरंगाबाद येथे उपचारदरम्यान २६ एप्रिल रोजी मृत्यू झाला.

मलकापुरातील महिलेचा स्वाइन फ्लूने मृत्यू
मलकापूर : शहरातील एका ४३ वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लू या संसर्गजन्य आजाराने एमआयटी हॉस्पीटल औरंगाबाद येथे उपचारदरम्यान २६ एप्रिल रोजी मृत्यू झाला असून या संदर्भात जिल्हा आरोग्य यंत्रणेला कळविण्यात आले आहे.
शहरातील ४३ वर्षीय महिलेला एमआयटी हॉस्पीटल औरंगाबाद येथे १७ एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते. या महिलेला स्वाईन फ्लू एन्फल्युएन्झाए (एच १ एन१) दूषित आजाराची लागण झाली होती. संसर्गजन्य अशा स्वाईन फ्लू या आजारा संदर्भात त्यांचेवर उपचार सुरु असताना २६ एप्रिल रोजी त्यांचा मृत्यू झाला.
प्राप्त माहितीनुसार मृतक या बसस्थानक मागील परिसरात कुठेतरी राहायच्या त्यांच्या निवासस्थानाबाबत मात्र ठोस अशी माहिती उपलब्ध होवू शकली नाही.
यासंदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सोनटक्के यांचेशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता त्यांनी स्वाईन फ्लूच्या आजाराने मलकापुरातील महिलेचा मृत्यू झाला ही बाब आम्हाला औरंगाबाद येथून कळल्याचे सांगितले.