त्या महिलेवर सामाजिक कार्यकर्त्यांनी केले अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:36 IST2021-04-20T04:36:05+5:302021-04-20T04:36:05+5:30

मध्य प्रदेश महाराष्ट्र सीमेवर असलेल्या आलनुर या गावातील एक पन्नास वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली हाेती. त्या महिलेला मध्य ...

The woman was cremated by social workers | त्या महिलेवर सामाजिक कार्यकर्त्यांनी केले अंत्यसंस्कार

त्या महिलेवर सामाजिक कार्यकर्त्यांनी केले अंत्यसंस्कार

मध्य प्रदेश महाराष्ट्र सीमेवर असलेल्या आलनुर या गावातील एक पन्नास वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली हाेती. त्या महिलेला मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथे उपचारासाठी नेण्यात आले; परंतु त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये बेड व रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध नसल्याने त्या रुग्णाला मुक्ताईनगर येथील हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले; परंतु त्याही ठिकाणी बेड व इंजेक्शन उपलब्ध होत नसल्याने या रुग्णांच्या नातेवाइकांनी चिखली येथील डॉ़ सुहास तायडे व डॉ. योगिता तायडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बुलडाणा येथील काेविड सेंटरमध्ये बेडची व्यवस्था करून दिली. तेथे रेमडेसिविर इंजेक्शन रयत क्रांती संघटनेचे विदर्भाध्यक्ष प्रशांत पाटील यांच्या पुढाकाराने केमिस्ट संघटनेचे चिखली शहराध्यक्ष स्वप्निल तायडे यांनी तत्काळ उपलब्ध करून दिले़; परंतु दुर्दैवाने महिलेचा मृत्यू झाला. काेराेना रुग्णाचा मृतदेह नगरपालिका हद्दीबाहेर नेता येत नसल्याने रयत क्रांती संघटनेचे विदर्भाध्यक्ष प्रशांत ढोरे पाटील, बुलडाणा नगरपालिकेचे शिवसेना नगरसेवक मोहन पऱ्हाड, चिखली केमिस्ट संघटनेचे शहराध्यक्ष स्वप्निल तायडे यांनी अंत्यसंस्कार केले. महिलेच्या मुलाला त्याच्या घरापर्यंत पोहोचवून देण्याची व्यवस्था केली़

Web Title: The woman was cremated by social workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.