वीज पडून शेतमजूर महिला ठार
By Admin | Updated: October 17, 2014 00:12 IST2014-10-17T00:05:22+5:302014-10-17T00:12:22+5:30
मेहकर तालुक्यातील माळखेड शिवारातील घटना.

वीज पडून शेतमजूर महिला ठार
मेहकर (बुलडाणा) : तालुक्यातील माळखेड शिवारात एका २८ वर्षीय महिलेच्या अंगावर वीज पडून ठार झाल्याची घटना १६ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता घडली. यामध्ये म्हैस, वगार व कुत्राही ठार झाले आहेत. यासंदर्भात सविस्तर वृत्त असे की, माळखेड येथील सौ.रेखा गजानन चेके (२८) ही गुरुवारला सकाळी शेतात गेली होती. दुपारच्या दरम्यान अचानक वीजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे सौ.रेखा चेके ही शेतात असलेल्या झोपडीमध्ये बसली. दरम्यान झोपडीवर वीज पडून रेखाचा जागेवरच मृत्यू झाला. तसेच झोपडीमध्ये असलेली म्हैस, वगार व कुत्राही दगावला आहे. घटनेची माहिती मिळताच साखरखेर्डा पोलिस स्टेशनचे ठाणेदार ब्राह्मणे, पी.एस.आय. चव्हाण, दशरथ कोकाटे यांनी घटनास्थळावर भेट दिली. यासंदर्भात माळखेड येथील गजानन रामदास लंबे यांनी साखरखेर्डा पोलिस स्टेशनला फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी जा.फौ. कलम १७४ नुसार आकस्मीक मृत्यूची नोंद केली आहे. घटनेचा पुढील तपास दशरथ कोकाटे हे करीत आहे.