प्रवासी वाहन उलटल्याने महिला ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2016 00:26 IST2016-11-19T00:26:29+5:302016-11-19T00:26:29+5:30
डोणगाव येथील महिला वाशिम येथून परतत असताना झाला अपघात.

प्रवासी वाहन उलटल्याने महिला ठार
डोणगाव, दि. १८- डोणगावपासून जवळच असलेल्या ग्राम गोहोगाव दांदडे येथील काळे परिवार वसारी येथून येत असता अँपे उलटल्याने अँपेतील महिला ठार झाल्याची घटना १८ नोव्हेंबरला घडली.
वसारी जि. वाशिम येथून गोहोगाव येथील काळे परिवार येत असताना अंचळ या गावाजवळ अचानक अँपे उलटल्याने त्यामध्ये गोहोगाव दांदडे येथील सखुबाई दशरथ काळे (५0) ह्या गंभीर जखमी झाल्या. दरम्यान, त्यांना डोणगाव प्राथमिक केंद्रात आणल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले.
जखमी झालेले लक्ष्मीबाई विठोबा काळे, प्रयागबाई तुकाराम काळे, लक्ष्मण पांडुरंग काळे, विकास भानुदास काळे, सै.असलम सै.अनवर सर्व रा. गोहोगाव दांदडे यांना उपचारासाठी मेहकर येथे हलविण्यात आले आहे.
याबाबत डोणगाव पोलीस स्टेशनला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.