दुर्धर आजाराला कंटाळून महिलेची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2017 00:46 IST2017-06-15T00:46:00+5:302017-06-15T00:46:00+5:30
मोताळा : तालुक्यातील कोथळीलगतच्या सुलतानपूर येथील ४५ वर्षीय महिलेने आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना १४ जून रोजी उघडकीस आली.

दुर्धर आजाराला कंटाळून महिलेची आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
मोताळा : तालुक्यातील कोथळीलगतच्या सुलतानपूर येथील ४५ वर्षीय महिलेने आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना १४ जून रोजी उघडकीस आली.
प्राप्त माहितीनुसार, सुलतानपूर (कोथळी) येथील कलाबाई मधुकर गरुडे (वय ४५) ह्या मागील काही वर्षांपासून दुर्धर आजाराने ग्रस्त होत्या. वेळोवेळी त्यांच्यावर उपचार करण्यात आले. मात्र, उपचाराला प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत होती. नुकतेच त्यांना बुलडाणा येथील रुग्णालयातून घरी आणले होते. मंगळवारी रात्रीदरम्यान त्यांनी घरासमोरील लाकडी खांबाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले व दोन मुली, असा आप्त परिवार आहे.