२४ तासांतच आरोपी गजाआड

By Admin | Updated: October 19, 2015 01:36 IST2015-10-19T01:36:17+5:302015-10-19T01:36:17+5:30

पुसद अर्बन एटीएम चोरीचे प्रकरण.

Within 24 hours, the accused will be arrested | २४ तासांतच आरोपी गजाआड

२४ तासांतच आरोपी गजाआड

चिखली (जि. बुलडाणा) : स्थानिक डी.पी. रोडवरील पुसद अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे एटीएम अत्यंत शिताफीने फोडून त्यातील ३ लाख ८४ हजार रूपये लंपास करणार्‍या आरोपीस ठाणेदार विजयसिंह राजपूत यांनी अवघ्या २४ तासांत जेरबंद करून दिलेला शब्द खरा ठरविल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. या प्रकरणा तील आरोपीकडून ३ लाख ४0 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. १८ ऑक्टोबर रोजी जिल्हा पोलिस अधिक्षक संजयकुमार बाविस्कर यांनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन प्रकरणाची संपूर्ण माहिती दिली. स्थानिक डी.पी. रोडवर पुसद अर्बनच्यावतीने एटीएम सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या एटीएम मशीन मधील ३ लाख ८४ हजार ८00 रूपये १0 ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी तांत्रीकदृष्ट्या अत्यंत शिताफीने लंपास केले होते. याप्रकरणी तब्बल ६ दिवसानंतर म्हणजेच १६ ऑक्टोबर रोजी पुसद अर्बनचे शाखा व्यवस्थापक नितीन एस.लांडे यांनी याबाबत चिखली पोलिसांत फिर्याद दाखल केली होती. या तक्रारीवरून चिखली पोलिसांनी कलम ३८0, ४६१ भादंवी नुसार गुन्हा दाखल केला असून तपास हाती घेतला होता. दरम्यान ठाणेदार विजयसिंग राजपूत यांनी या प्रकरणाचा २४ तासात छडा लावू असा विश्‍वास दिला तो सार्थ ठरवित या प्रकरणातील आरोपी नंदकिशोर भानुदास शेळके वय २५ वष्रे, रा.भालगाव यास अटक करून त्याच्याकडून ३ लाख ४0 हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

Web Title: Within 24 hours, the accused will be arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.