शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

पेट्रोल-डिझेलची दरवाढ मागे घ्या - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2021 4:36 AM

शेतकरीविराेधी कायदे रद्द करा बुलडाणा : केंद्र सरकारने केलेले तीन कृषी कायदे शेतकऱ्यांविरुद्ध आहेत. हे कायदे तातडीने रद्द करण्याची ...

शेतकरीविराेधी कायदे रद्द करा

बुलडाणा : केंद्र सरकारने केलेले तीन कृषी कायदे शेतकऱ्यांविरुद्ध आहेत. हे कायदे तातडीने रद्द करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी लाेणार तहसीलसमाेर वंचितच्या वतीने धरणे आंदाेलन करण्यात आले.

नरहरी महाराजांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

बुलडाणा : संत नरहरी महाराज साेनार मंडळाच्या वतीने संत नरहरी महाराजांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी समाजाचे अध्यक्ष श्रीराम उज्जैनकर, विश्वनाथ ठाेसर, नीलेश रत्नपारखी आदींसह इतर उपस्थित हाेते.

१९ गावांतील शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा

सिंदखेड राजा : तालुक्यातील १९ गावांत फेब्रुवारी महिन्यात झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे रब्बी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. गारा पडल्याने शेतात उभ्या असलेला गहू, हरभरा, शाळू, फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. जवळपास १९ गावांतील ४ हजार २१५ हेक्टर कृषिक्षेत्र बाधित झाले आहे. या शेतकऱ्यांना अजूनही मदत मिळालेली नाही.

लघुपाटबंधारे विभागात रिक्त पदे

बुलडाणा : पाटबंधारे विभागात वर्षभरापासून पदभरती न झाल्याने रिक्त पदांची संख्या वाढली आहे. अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कार्यभार वाढल्याचे चित्र आहे. त्यामुळे पाणी असून, सिंचन नियोजन होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. रिक्त पदे भरण्याची मागणी कर्मचाऱ्यांमधून होत आहे.

आठवडी बाजार बंदचा व्यावसायिकांना फटका

जानेफळ : काेराेनाच्या वाढत्या संसर्गामुळे येथे शनिवारी भरणारा आठवडी बाजार ग्रामपंचायत प्रशासनाने रद्द केला. या बाजारात परिसरातील अनेक व्यावसायिक आपली दुकाने मांडतात. बाजार रद्द झाल्याने त्यांना आर्थिक फटका बसला आहे.

रिक्त पदांमुळे कामाचा ताण वाढला

बुलडाणा : पोलीस उपनिरीक्षकांची संख्या ११९ हवी असताना प्रत्यक्षात ३३ पोलीस उपनिरीक्षक जिल्ह्यात कमी आहेत. पोलीस निरीक्षकांचीही संख्या जिल्ह्यात कमी आहे. त्यामुळे नियमित कामांव्यतिरिक्त अन्य कामे सांभाळताना कर्मचाऱ्यांवर ताण येतो.

जि.प.शाळेतील प्रसाधनगृहांची दुरवस्था

बुलडाणा : जिल्ह्यातील अनेक गावांतील जिल्हा परिषद शाळांमधील प्रसाधनगृहांची दुरवस्था झाली आहे. काेराेनामुळे शाळा बंद हाेत्या. काही दिवसांपूर्वीच शाळा सुरू करण्यात आल्या हाेत्या. शाळा पुन्हा बंद करण्यात आल्या आहेत. शाळा बंद असताना प्रसाधनगृहांची दुरवस्था झाली आहे.

शेत रस्त्यावरील पुलाचा प्रश्न लागला मार्गी

बुलडाणा : लोणार तालुक्यातील कारेगाव येथील शेत रस्त्यावरील पूल बांधकामासाठी मदतीचे हात सरसावले आहेत. मुळे अण्णा यांनी १ लाख ११ हजार रुपयांची मदत केली आहे. त्यामुळे या शेत रस्त्यावरील पुलाचा प्रश्न मार्गी लागला आहे.