खामगावात विजेच्या धक्क्याने वायरमनचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 15:06 IST2018-06-19T15:06:17+5:302018-06-19T15:06:17+5:30
खामगाव : येथील दाळ फैल भागात वीज वितरण कंपनीच्या खांबावर चढून काम करीत असलेल्या वायरमनचा मृत्यू झाला.

खामगावात विजेच्या धक्क्याने वायरमनचा मृत्यू
ठळक मुद्देमहेश जयसिंग तोमर (३२) रा. बोरजवळा असे मृतकाचे व्यक्तीचे नाव वीज पोलवर दुरूस्तीचे काम करीत असताना पोलमध्ये करंट आल्याने तोमर पोलला चिटकले.
खामगाव : येथील दाळ फैल भागात वीज वितरण कंपनीच्या खांबावर चढून काम करीत असलेल्या वायरमनचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी १२ वाजता दरम्यान घडली. महेश जयसिंग तोमर (३२) रा. बोरजवळा असे मृतकाचे व्यक्तीचे नाव असून, ते फरशी वीज वितरण केंद्रावर वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून कार्यरत होते. दुपारी १२ वाजता दरम्यान, दाळ फैल भागातील वीज पोलवर दुरूस्तीचे काम करीत असताना पोलमध्ये करंट आल्याने तोमर पोलला चिटकले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना पोलवरून काढण्यात आले. त्यानंतर एका खासगी दवाखान्यात नेण्यात आले. तेथून त्यांना सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.