वैद्यकीय महाविद्यालयासाठी पाठपुरावा करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:29 IST2021-01-15T04:29:12+5:302021-01-15T04:29:12+5:30
सर्व राजकारण बाजूला ठेवून विकासाच्या मुद्द्यावर सिंदखेडराजातील सर्व पक्षीय मंडळी केवळ एकत्रच आली नाही तर, मेडिकल कॉलेज हे भविष्यातील ...

वैद्यकीय महाविद्यालयासाठी पाठपुरावा करणार
सर्व राजकारण बाजूला ठेवून विकासाच्या मुद्द्यावर सिंदखेडराजातील सर्व पक्षीय मंडळी केवळ एकत्रच आली नाही तर, मेडिकल कॉलेज हे भविष्यातील विकासाचे मोठे प्रकल्प सिंदखेडराजा येथे यावेत, यासाठी मातृतीर्थ विकास सर्वपक्षीय संघर्ष समिती काम करणार असल्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला. बुलडाणा जिल्ह्याचा शेवटचा तालुका असलेला सिंदखेडराजा मतदारसंघ सर्वार्थाने मागासलेला आहे. आता समृद्धी महामार्ग, त्याजवळील स्मार्ट सिटी, पालकमंत्री डॉ. शिंगणे यांच्या मंत्रालयाच्या माध्यमातून फार्मा युनिट असे अनेक नवे प्रकल्प दृष्टिपथात आहेत. त्यातच मेडिकल कॉलेजची भर पडल्यास सिंदखेडराजा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधला जाईल, अशी जनभावना आहे. हा विकास साध्य करून घेण्यासाठी या बैठकीत निर्धार करण्यात आला. बैठकीला नगराध्यक्ष सतीश तायडे, माजी नगराध्यक्ष नाझेर काजी, छगनराव मेहेत्रे, विष्णु मेहेत्रे यांच्यासह आजी, माजी नगरसेवक, विविध पक्षांचे पदाधिकारी, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.
दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शरद पवार, खा. सुप्रिया सुळे, आरोग्यमंत्री, वैद्यकीय शिक्षणमंत्री, केंद्रीय आरोग्य मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री यांना तत्काळ निवेदन पाठविण्यात आले.