वन्यप्राण्यांनी कांदा केला फस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:35 IST2021-03-18T04:35:10+5:302021-03-18T04:35:10+5:30

साखरखेर्डा : शिंदी येथील एका शेतकऱ्याच्या शेतातील कांदा पिकाची रोही या प्राण्यांनी नासाडी केली आहे. वन अधिकाऱ्यांनी ...

The wild animals made onion | वन्यप्राण्यांनी कांदा केला फस्त

वन्यप्राण्यांनी कांदा केला फस्त

साखरखेर्डा : शिंदी येथील एका शेतकऱ्याच्या शेतातील कांदा पिकाची रोही या प्राण्यांनी नासाडी केली आहे. वन अधिकाऱ्यांनी या पिकाची पाहणी करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे. शेतकरी नैसर्गिक संकटांना तोंड देत स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवत आहेत. सिंदखेडराजा तालुक्यातील शिंदी येथील शेतकरी गणेश भुतेकर यांनी चार एकर शेतामध्ये दोन एकर खाण्याचा कांदा व दोन एकर मध्ये बियाच्या कांद्याची लागवड केली होती. परंतु रात्री-बेरात्री येणाऱ्या रोही प्राण्यांच्या कळपाने उच्छाद मांडल्यामुळे पिके पूर्णपणे उद्ध्वस्त केली आहे. रोहीचे कळप रात्री येऊन कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान करत आहे. शेतकरी गणेश भुतेकर यांच्या शेतातील साडेतीन एकरातील कांदा पिकाचे रोही या प्राण्यांनी नुकसान केले आहे. त्यांनी वनविभाग मेहकर यांना निवेदन दिले असून मदत देण्याची मागणी केली आहे.

Web Title: The wild animals made onion