पत्नीची दगडाने ठेचून हत्या
By Admin | Updated: December 2, 2015 02:33 IST2015-12-02T02:33:18+5:302015-12-02T02:33:18+5:30
देऊळगावराजा तालुक्यातील घटना; पतीचे दे. मही पोलिसांपुढे आत्मसर्मपण

पत्नीची दगडाने ठेचून हत्या
देऊळगावराजा(जि. बुलडाणा ): रागाच्या भरात पतीने पत्नीची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना मंगळवारी १ डिसेंबर रोजी दुपारी तालुक्यातील रोहणा शिवारातील शेतात घडली. पत्नीचा खून केल्यानंतर पतीने स्वत: देऊळगावमही पोलीस चौकीत आत्मसर्मपण करून घटनेची माहिती पोलिसांना दिली.
रोहणा गावातील ज्ञानदेव दौलत डोके (३१) याचे लग्न आठ वर्षांंंपूर्वी बाजीउमरद जि. जालना येथील त्यांच्या मामाची मुलगी रेखा हिच्याशी झाले होते. त्यांना एक मुलगा व एक मुलगी असे दोन अपत्य आहे. आज सकाळी ज्ञानदेव डोके व पत्नी रेखा हे दोघे उपचारासाठी देऊळगावमही येथे दवाखान्यात आले होते. आपले काम आटोपून दुपारी रोहणा गावाकडे परत निघाले.
टाकरखेड भागिले गावाजवळून निघणार्या पांदण रस्त्याने रोहणा गावाकडे जात असताना दोघांमध्ये क्षुल्लक कारणातून वाद झाला. हा वाद विकोपाला जाऊन रागाच्या भरात पती ज्ञानदेव याने दगडाने रेखाच्या डोक्यावर वार केला. यात गंभीर जखमी झाल्याने रेखाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपी ज्ञानदेवने देऊळगावमही पोलीस चौकी गाठली. पत्नीचा खून केल्याची कबुली पोलिसांनी दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत परदेशी, ठाणेदार ए.के. हिवाळे, चौकी अधिकारी अकिल काझी व पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह देऊळगावमही येथे आणण्यात आला. तेथे शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आला. वृत्त लिहेपर्यंंंत ज्ञानदेव डोके याच्या विरुद्ध दे. राजा पोलिसात गुन्हा दखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. तर रात्री ८ वाजता मृत रेखा डोके हिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.