पत्नीला विहिरीत ढकलले!
By Admin | Updated: April 24, 2017 00:04 IST2017-04-24T00:04:01+5:302017-04-24T00:04:01+5:30
साखरखेर्डा : राताळी शिवारात एका ३९ वर्षीय महिलेला विहिरीत ढकलून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतीविरुद्ध साखरखेर्डा पोलिसांनी शनिवारी गुन्हा दाखल केला.

पत्नीला विहिरीत ढकलले!
गुन्हा दाखल; महिला गंभीर जखमी
साखरखेर्डा : साखरखेर्डा पोलीस स्टेशनांतर्गत राताळी शिवारात एका ३९ वर्षीय महिलेला विहिरीत ढकलून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतीविरुद्ध साखरखेर्डा पोलिसांनी शनिवारी सायंकाळी गुन्हा दाखल केला आहे.
सिंदखेड राजा तालुक्यातील शेलूद येथील रंजना बबन भंडारे (वय ३९ वर्ष) आणि पती बबन रामजी भंडारे हे दोघे पती-पत्नी रानअंत्री येथे मोलमजुरी करून राहत होते. २२ एप्रिल रोजी सकाळी ७ ते ८ च्या सुमारास कामानिमित्त दोघे घराबाहेर पडले; परंतु बबनच्या मनात वेगळेच काहीतरी शिजत होते. शेषराव काळे यांच्या विहिरीवर रंजना ही पाणी आणण्यासाठी गेली असता तिला विहिरीत ढकलून वरतून दगडाचा मारा केला. यात रंजना ही गंभीर जखमी झाली. त्यातही तिने आरडा ओरड केल्याने इतर शेतकरी विहिरीकडे धावले आणि गंभीर जखमी रंजना हिला तातडीने बुलडाणा येथे हलविले.
घटनास्थळावर पोहेका अरविंद चव्हाण यांनी जाऊन स्वत: साखरखेर्डा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्या तक्रारीवरून कलम ३०७ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. गंभीर जखमी रंजना भंडारे ही जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत आहे.