ब्लेडने वार केल्याने पती-पत्नी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 00:04 IST2017-07-18T00:04:07+5:302017-07-18T00:04:07+5:30

जांब येथील आरोपी भावाविरुद्ध गुन्हा दाखल

Wife and wife injured due to blade injuries | ब्लेडने वार केल्याने पती-पत्नी जखमी

ब्लेडने वार केल्याने पती-पत्नी जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क
धाड : शेतात तणनाशक का फवारले, असे विचारले; या कारणावरून एका भावाने दुसऱ्या भावासह त्याचे पत्नीस ब्लेडने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना बुलडाणा तालुक्यातील ग्राम जांब येथे १७ जुलै रोजी घडली.
जांब येथील शरद नारायण ताठे व समाधान लक्ष्मण ताठे या दोघा भावात शेतीच्या कारणावरून जुना वाद होता. दरम्यान, आज रोजी सकाळी शरद ताठे याने आरोपी समाधान ताठे यास माझे शेतात तणनाशक का फवारले, याची विचारणा केली असता, आरोपीने रागाच्या भरात खिशातील ब्लेडने फिर्यादी शरद ताठे याच्या गालावर, डोक्यावर वार केले. दरम्यान, शरद ताठेची पत्नी घटनास्थळी हजर होती.
प्रकार पाहताच ती मध्ये गेली असता, आरोपीने तिच्यावरही ब्लेडने तोंडावर वार करून दोघांना जखमी केले. या घटनेची फिर्याद शरद ताठे यांनी धाड पोलिसात दिली. पोलिसांनी आरोपी विरुद्ध कलम ३२४ भादंविनुसार गुन्हा नोंद केला आहे. तपास ठाणेदार संग्राम पाटीलसह पोहेकाँ ओमप्रकाश साळवे, बळीराम खंडागळे हे करीत आहे.

Web Title: Wife and wife injured due to blade injuries