पांढरे सोने मातीमोल
By Admin | Updated: September 22, 2014 00:27 IST2014-09-22T00:27:05+5:302014-09-22T00:27:05+5:30
शासनाची खरेदी नाही : ओला असल्याचे नावावर २७00 रुपये क्विंटलनेच खरेदी.

पांढरे सोने मातीमोल
पंजाबराव ठाकरे / संग्रामपूर (बुलडाणा)
शासनाच्या हमी भावाच्या कायद्याचे उल्लघंन करुन ग्रामीण भागात पांढर्या सोन्याची मातीमोल भावाने खरेदी सुरु आहे. याकडे कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे व संबंधीतांचे दुर्लक्ष होत असल्याने ओला कापूस नावाखाली २ हजार पासून तर २७00 रुपयांपर्यंंतच कापसाची खरेदी केली जात आहे.
विदर्भाचे नगदी व मुख्य पिक म्हणून ख्याती प्राप्त पांढर्या सोन्याला शासनाच्या आडमुठय़ा धोरणाची लागण झाल्याने व निसर्गाच्या अवकृपेने विदर्भात कपाशी पिकाचा पेरा सातत्याने घटत आहे. दिवसेंदिवस कपाशी पीक घेण्याबाबत शेतकर्यांची उदासिनता वाढत आहे.