शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

अबब... पांढऱ्या सोन्याने गाठला पाच वर्षातील नीचांक; कापसाची बोंडे खुललीच नाही

By विवेक चांदुरकर | Updated: December 23, 2023 17:38 IST

कवळीने दर्जा घसरला, फक्त ४५०० रुपये भाव

विवेक चांदूरकर, लोकमत न्यूज नेटवर्क, खामगाव (बुलढाणा): अवकाळी पाऊस, बोंडअळीच्या प्रादुर्भावाने कापसाचा दर्जा घसरला आहे. कापसाची बोंडे खुलली नसून कवळीमुळे कापसाचे मोठे नुकसान झाले आहे. चक्क ४५०० रुपये क्विंटलने कापसाची खरेदी करण्यात येत असून, ६५०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. त्यामुळे यावर्षी कापूस उत्पादक शेतकरी पूर्णत: उद्ध्वस्त झाला आहे. गत पाच वर्षातील कापसाचा हा नीचांकी दर आहे.

२०२१-२२ मध्ये कापसाचे दर १२ ते १३ हजार रुपयांवर पोहोचले हाेते. २१-२२ मध्ये ७२०० ते ११,६५० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले होते. त्यामुळे २२-२३ वर्षामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कापसाची पेरणी केली होती. २२-२३ मध्ये कापसाला ६२०० ते ९४०० रुपये भाव मिळाले. सरासरी दर ७८०० होते. २३-२४ मध्ये मात्र कापसाच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. व्यापारी फक्त ४५०० रुपयांपासून कापसाची खरेदी करीत आहेत. चांगल्या कापसाला ६५०० रुपये भाव मिळत आहे. शासकीय हमीभाव केंद्र सुरू करण्यात आले असले तरी एफएक्यूच्या अडचणीमुळे शेतकरी व्यापाऱ्यांकडे शेतमाल विकण्याला प्राधान्य देतात. कापसाच्या दर्जाचे कारण सांगत व्यापारी अल्पभावात कापूस खरेदी करीत आहेत.

कापूस पडला काळा

जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला. सतत चार ते पाच दिवस अवकाळी पाऊस झाल्यामुळे कापूस भिजला. भिजलेला कापूस काही प्रमाणात काळा पडला आहे. तसेच कपाशीची झाडे खाली पडल्याने कापसात माती मिसळली आहे. यासोबतच कापसाची बोंडे खुलली नसून कवळी असल्यामुळे कापसाचे मोठे नुकसान झाले आहे.

गत चार वर्षातील भाव

वर्ष दर सरासरी

  • २०२० - २१ ४८०० ते ६२०० ५५००
  • २०२१ - २२ ७२०० ते ११,६५० ९४००
  • २०२२ - २३ ६२०० ते ९४०० ७८००
  • २०२३ - २४ ४५०० ते ७१०० ५७००

ग्रामीण भागात ४८०० ते ६५०० रुपयांपर्यंत भाव आहेत. यावर्षी पावसामुळे कापसाचा दर्जा घसरला आहे. तसेच कवळीमुळे भाव पडले आहेत. ४८०० रुपयांपासून कापसाची खरेदी करण्यात येत आहे. अनेक शेतकरी याच भावात कापसाची विक्री करीत आहेत.- विनोद बोंबटकार. व्यापारी, जळगाव जामोद 

भाववाढीच्या अपेक्षेने १०६ टक्के पेरणीगत दोन वर्षांत कापसाला चांगले भाव मिळाले होते. कापसाचे भाव चांगले राहतील या अपेक्षेने जिल्ह्यात शेतकऱ्यांनी यावर्षी १०६ टक्के पेरणी केली. जिल्ह्यात कापसाचे सरासरी क्षेत्र १ लाख ८३ हजार ५६०.०६ हेक्टर आहे, तर यावर्षी १ लाख ९४ हजार ९२९ हेक्टरवर पेरणी करण्यात आली. मात्र, शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग झाला असून, केवळ ४५०० रुपये भाव मिळत आहे.

यावर्षी कापसाला कमी भाव मिळत आहे. अवकाळी पावसाने व बोंडअळीने कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे दर्जा नसलेल्या कापसाला फक्त ४५०० रुपयेच दर मिळत आहेत. शासनाने कापूस उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेऊन मदत करण्याची गरज आहे.- पुरुषोत्तम मेतकर, बाजारभाव अभ्यासक, खामगाव.

टॅग्स :buldhanaबुलडाणा