३०० रुपयांची लाच घेताना तलाठी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:52 IST2021-02-23T04:52:33+5:302021-02-23T04:52:33+5:30

बुलडाणा : ३०० रुपयांची लाच घेताना हिवरखंड येथील तलाठ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने २२ फेब्रुवारी राेजी गजाआड केले. नीलेश ...

While taking bribe of Rs | ३०० रुपयांची लाच घेताना तलाठी गजाआड

३०० रुपयांची लाच घेताना तलाठी गजाआड

बुलडाणा : ३०० रुपयांची लाच घेताना हिवरखंड येथील तलाठ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने २२ फेब्रुवारी राेजी गजाआड केले. नीलेश शरद जाधव असे आराेपी तलाठ्याचे नाव आहे. लाेणार तालुक्यातील पिंप्री खंदारे येथील २८ वर्षीय महिला शेतकऱ्याला शेतीच्या सातबाऱ्यावर विहिरीची नाेंद करण्यासाठी तलाठी नीलेश शरद जाधव याने ५०० रुपयांची लाच मागितली. महिला शेतकऱ्याला लाच द्यायची नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तलाठ्याची तक्रार केली. त्यानुसार सापळा रचण्यात आला. तडजाेडीअंती तलाठी नीलेश जाधव याने ३०० रुपयांची लाच स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने त्यास रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी तलाठी जाधवविरुद्ध बिबी पाेलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू हाेती. ही कारवाई पाेलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनात पाेलीस उपअधीक्षक संजय चाैधरी, पाेलीस निरीक्षक श्रीकांत निचळ, पाेलीस नाइक साखरे, बैरागी, विनाेद लाेखंडे, स्वाती वाणी, चालक रगड आदींनी केली आहे.

Web Title: While taking bribe of Rs