२0 हजारांची लाच घेताना विक्रीकर उपायुक्ताला पकडले
By Admin | Updated: October 10, 2014 00:24 IST2014-10-09T23:58:55+5:302014-10-10T00:24:34+5:30
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची खामगावात कारवाई.

२0 हजारांची लाच घेताना विक्रीकर उपायुक्ताला पकडले
खामगाव (बुलडाणा) : कर निर्धारण करून देण्यासाठी २0 हजार रूपयांची लाच घेताना खामगाव येथील विक्रीकर कार्यालयातील मूल्यकर निर्धारण उपायुक्त प्रकाश खर्चे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी रंगेहाथ पकडले.
बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथील गुरुदेव ट्रेडर्सचे महादेव देवमाने यांना मूल्यकर निर्धारण उपायुक्त प्रकाश माधव खर्चे यांनी २0 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. महादेव देवमाने यांनी यासंदर्भात बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून, विक्रीकर कार्यालयात दुपारी २.३0 वाजताच्या सुमारास उपायुक्त प्रकाश खर्चे यांना देवमाने यांच्याकडून २0 हजारांची लाच घेताना पकडले. त्यांच्याजवळून लाचेची रक्कम जप्त करण्यात आली असून, याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.