नाफेड व पणन संघाकडून खरेदी केव्हा?

By Admin | Updated: October 16, 2014 23:32 IST2014-10-16T23:32:21+5:302014-10-16T23:32:21+5:30

पणन महासंघामार्फत अद्याप खरेदी केंद्रच सुरू न केल्याने शेतक-यांची अडवणूक.

When to buy from Nafed and Marketing team? | नाफेड व पणन संघाकडून खरेदी केव्हा?

नाफेड व पणन संघाकडून खरेदी केव्हा?

खामगाव (बुलडाणा): शेतमालास किमान आधारभूत हमीभाव मिळावा, यासाठी शासनाने हमीदर जाहीर करुन नाफेड तसेच पणन महासंघामार्फत प्रत्येक तालुकास्तरावर केंद्र उघडून शेतमालाची खरेदी करण्यात येते. मात्र यावर्षी अद्यापही हमीदराने शेतमाल खरेदी केंद्र सुरु झाली नसल्याने व्यापार्‍यांकडून शेतकर्‍यांची अडवणूक केल्या जात आहे.
यावर्षी सुरुवातीपासून नैसर्गिक संकटाचा सामना शेतकर्‍यांना करावा लागत आहे. सुरुवा तीला पावसाळ्याचा दीड महिना उलटूनही पावसाचा थेंबही नव्हता. त्यामुळे पेरण्या रखडल्या. परिणामी शेतकर्‍यांना हवे ते पिक न घेता येईल त्या पिकाची पेरणी करावी लागली. त्यानंतरही पावसाने उघाड दिल्याने अनेकांचे सोयाबीन पिक शेंगा परिपक्त होण्याआधीच वाळले. तसेच कापसावरही अज्ञात रोगाने आक्रमण केले आहे. त्यामुळे यावर्षी पेरणीचा खर्च निघणे कठीण झाले आहे. तर ज्या काही प्रमाणात शेतमाल निघत आहेत. त्याला सुध्दा भाव नाहीत. शेतमालास हमीभाव मिळावे, यासाठी शासनाकडून नाफेड तसेच पणन महासंघामार्फत उडिद, मूग, तूर, सोयाबीन, ज्वारी, कापूस या शेतमालाची खरेदी करण्यात येते. मात्र यावर्षी राज्यात कोठेच ही खरेदी केंद्र सुरु झाली नाहीत. त्यामुळे या फायदा घेत व्यापारी शेतकर्‍यांचा शेतमाल हमीदरापेक्षाही कमी दराने खरेदी करीत आहेत. येणारी दिवाळी तसेच रब्बीचा हंगाम यासाठी शेतकर्‍यांना नाईलाजाने या कमी भावातही शे तमाल विकावा लागतो. त्यामुळे नाफेड तसेच पणन महासंघाने शेतमाल खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी लवकर मुहूर्त काढावा, अशी मागणी शेतकर्‍यांकडून केली जात आहे.

Web Title: When to buy from Nafed and Marketing team?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.