गव्हाच्या सुडीस आग
By Admin | Updated: March 17, 2017 02:35 IST2017-03-17T02:35:25+5:302017-03-17T02:35:25+5:30
धाडनजिक जामठी येथील घटनाय ९३ हजाराचे नुकसान.

गव्हाच्या सुडीस आग
धाड(बुलडाणा), दि. १६- धाडपासून अवघ्या ७ कि.मी. अंतरावर असलेल्या जामठी या गाव शिवारातील एका शेतकर्याच्या शेतातील गव्हाचे सुडीस (गंजी) आग लागून या घटनेत ९५ हजारांचे नुकसान झाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली.
जामठी येथील शेतकरी पांडुरंग गोपाळा रावळकर यांचे जामठी शिवारातील गट नं. १७२ मधील शेतातून महावितरणच्या वीजपुरवठा करणार्या तारा लोंबकळत होत्या. दरम्यान हवेमुळे रात्री घर्षण होऊन शॉर्ट सर्किट झाले व आग लागली. या शेतात गव्हाची सुडी घातली होती. वार्याने आग सुडीपर्यंंत पोहचली.
यावेळी आगीने रौद्र रूप धारण करत गंजीच्या आसपास असणार्या स्प्रिंक्लर सेट, वायर केबल जळून खाक झाली आहे. या घटनेत ३0 क्विंटल गव्हाची सुडी, स्प्रिंकलर सेट, लाइन केबल बंडल असे ९३ हजारांचे नुकसान झाले आहे.
या घटनेची माहिती होताच तलाठी गवळी हय़ांनी घटनास्थळी पंचनामा केला आहे. हाता-तोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी हवालदिल झाला असून, नुकसानग्रस्त शेतकर्यास तत्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे.