लोणार सरोवरातील सासु-सुनेची विहीर १९ वर्षानंतर दृष्टीपथास 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 01:21 PM2018-04-30T13:21:24+5:302018-04-30T13:21:24+5:30

लोणार :  पाण्याच्या लोणार सरोवरातील पाणीपातळी यंदा झपाट्याने घटली असून त्यामुळे सौभाग्य तिर्थ (योनी कुंड) दृष्टीपथास येत आहे.

well in lonar lake open after 19 years | लोणार सरोवरातील सासु-सुनेची विहीर १९ वर्षानंतर दृष्टीपथास 

लोणार सरोवरातील सासु-सुनेची विहीर १९ वर्षानंतर दृष्टीपथास 

Next
ठळक मुद्दे गेल्या पाच वर्षापासून सरोवरातील पाण्याची पातळी झपाट्याने घटत आहे.यापूर्वी १९९८ मध्ये ही विहीर सहजगत्या दृष्टीपथास पडली होती. सासु सुनेची विहीरी म्हणजेच एकाच विहीरीतील पाण्याची चव ही गोड व खारट आहे.

लोणार :  पाण्याच्या लोणार सरोवरातील पाणीपातळी यंदा झपाट्याने घटली असून त्यामुळे सौभाग्य तिर्थ (योनी कुंड) दृष्टीपथास येत आहे. सासु-सुनेची विहीर म्हणून बोलीभाषेत ही विहीर प्रचलीत आहे. हे कुंड उघडे पडल्याने पर्यटकांसह वन अधिकारी व कर्मचार्यांनी सलग सुट्यांचा फायदा घेत हे तिर्थ बघण्यासाठी येथे गर्दी केली आहे. गेल्या पाच वर्षापासून सरोवरातील पाण्याची पातळी झपाट्याने घटत आहे. त्यात यंदा पुन्हा वाढ झाली आहे. गेल्या वर्षीही या सासु सुनेच्या विहीरीचा काढ दिसला होता. वाढत्या तापमानामुळे व अपुऱ्या पावसामुळे पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत आहे. वाढत्या तापमानामुळे व अपुऱ्या पावसामुळे पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत आहे. यापूर्वी १९९८ मध्ये ही विहीर सहजगत्या दृष्टीपथास पडली होती. मात्र सरोवराच्या पाण्याची पातळी नंतर अचानक वाढल्यामुळे ही विहीर पुन्हा पाण्यात लुप्त झाली होती. लोणार सरोवराचे ऐतिहासिक, वैज्ञानिक व पौराणीक असे तिहेरी महत्त्व असल्याने ही घटना अभ्यासकांसाठी महत्त्वपूर्ण ठरणारी आहे. त्यातच पर्यटकांनाही जवळास दोन तपानंतर ही विहीर पाण्याचा योग आल्याने त्यांचीही येथे गर्दी होत आहे.

कमळजा मंदिरालगत आहे विहीर

सरोवरात असलेल्या कमळजा माता मंदिरासमोर असलेल्या या विहिरीला योनी कुंड (सौभाग्य तिर्थ) असे सुध्दा संबोधल्या जाते. त्या कुंडास सासु सुनेची विहीर असे प्रचलीत नाव आहे. सासु सुनेची विहीरी म्हणजेच एकाच विहीरीतील पाण्याची चव ही गोड व खारट आहे. मंदिराकडील बाजुची चव ही गोड असल्यामुळे तिला सुनेंची विहीर तर सरोवराकडील विहीरीतील पाणी खारट असल्यामुळे तिला सासुची विहीर असे संबोधल्या जाते.

जलतीर्थ, स्थलतीर्थ, धर्मतीर्थ, अर्थतीर्थ, कामतीर्थ, मोक्षतीर्थ असे तिर्थाचे विविध प्रकार आहेत. जलतिर्थामुळे शारीरिक शुद्धी होऊन मन प्रसन्न होते अशी धारणा आहे. जलतीर्थ व मोक्षतीर्थ असे दुहेरी सासुसुनेचे पौराणिक तथा धार्मिक महत्त्व आहे. त्यामुळे ही विहीर बघण्यासाठी पर्यटक गर्दी करीत आहेत.

- प्रा. डॉ. सुरेश मापारी, इतिहास संशोधक , लोणार.

Web Title: well in lonar lake open after 19 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.