गाळाने भरलेल्या विहिरीचे पुनरुज्जीवन!
By Admin | Updated: March 4, 2016 02:27 IST2016-03-04T02:27:31+5:302016-03-04T02:27:31+5:30
किनगावराजा येथे नागरिकांच्या प्रयत्नातून विहीरीचे जलस्त्रोत पुर्ववत.

गाळाने भरलेल्या विहिरीचे पुनरुज्जीवन!
सिंदखेडराजा (जि. बुलडाणा): दिवसेंदिवस पाण्याची भीषण टंचाई निर्माण होत असताना पाण्याचे स्रोत शोधता शोधता महिला व पुरुषांची दमछाक होत आहे. किनगावराजा येथेही पाण्याची भीषण टंचाई असून, गावातील एक विहीर गाळाने भरलेली होती. त्या विहिरीचे पुनर्जीवन जि.प. सदस्य विनोद वाघ यांनी स्वत: करून नागरिकांना खुली करून दिली. तालुक्यातील किनगावराजा येथील महादेव मळा भागातील नागरिकांना पाणी उपलब्ध व्हावे, म्हणून तेथील नागरिकांनी जि.प. सदस्य विनोद वाघ यांच्याकडे विहीर खोलीकरणाची मागणी केली. गेल्या अनेक वर्षांंपासून त्या विहिरीचा वापर नसल्याने विहीर पूर्णपणे काटेरी झुडुपांनी व्यापली होती. २८ फेब्रुवारीला स्वत: विनोद वाघ त्या ठिकाणी पोहचले त्यांनी आणि भाजपा कार्यकर्त्यांनी विहिरीवरील झाडे झुडुपे काढून विहिरीतील गाळ काढण्याला सुरुवात केली. गाळ काढत असताना विहिरीतील पाझर सुरू झाले. विहिरीत पाणी पाहून लोकांच्या चेहर्यावरील आनंद द्विगुणित झाला. कित्येक वर्षांंपासून वहिरीत गाळ साचलेला असल्याने १५ हजार रुपये स्वत: गाळ काढण्यासाठी दिले. एक लोकप्रतिनिधी कर्तव्य बजावत असताना विनोद वाघ यांनी आपले दायित्व पार पाडले. यावेळी भाजपाचे युवराज नागरे, पवन झोरे, ज्ञानेश्वर काकडे, राधाकिसन हरकळ, जनार्दन हरकळळ, सुखदेव खरात, अविनाश काटे, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.