विहिरीत पडून इसमाचा मृत्यू
By Admin | Updated: June 29, 2017 00:06 IST2017-06-29T00:06:14+5:302017-06-29T00:06:14+5:30
सावत्रा : येथील केशव जनार्धन पगारे (३५) या इसमाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना २८ जून रोजी उघडकीस आली.

विहिरीत पडून इसमाचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
सावत्रा : येथील केशव जनार्धन पगारे (३५) या इसमाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना २८ जून रोजी उघडकीस आली.
केशव पगारे २६ जून रोजी नेहमीप्रमाणे मित्रासोबत लाकूड कटाईचे काम करण्यासाठी घरुन गेला; परंतु संध्याकाळी घरी परत आला नाही. त्याच्या वडिलांनी शोध घेतला; परंतु तो दिसला नाही. २८ जूनच्या सकाळी सावत्रा येथील झोपडपट्टीजवळ असलेल्या विहिरीवर त्याची चप्पल आढळून आल्यामुळे त्याचे नातेवाईकांनी विहिरीमध्ये गळ टाकला असता त्याचा मृतदेह गळाला लागून वर आला. सावत्रा गावचे पोलीस पाटील सुनीता काठोळे यांच्या माहितीवरुन जानेफळ पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह विहिरीबाहेर काढला.