विहिर खचली; ढिगाऱ्याखाली दबल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू, तीन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 01:31 PM2019-06-29T13:31:36+5:302019-06-29T14:45:28+5:30

खामगाव:  विहिरीतील पाणी पाहत असताना अचानक विहीरीची कडा खचल्याने मातीच्या भरावाखाली चार शाळकरी मुले दबल्याची घटना खामगाव तालुक्यातील पोरज येथे  शनिवारी दुपारी घडली.

The well collapse; Three people were buried under the charge | विहिर खचली; ढिगाऱ्याखाली दबल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू, तीन जखमी

विहिर खचली; ढिगाऱ्याखाली दबल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू, तीन जखमी

googlenewsNext

खामगाव:  विहिरीतील पाणी पाहत असताना अचानक विहीरीची कडा खचल्याने मातीच्या भरावाखाली चार शाळकरी मुले दबल्याची घटना खामगाव तालुक्यातील पोरज येथे  शनिवारी दुपारी घडली. यामध्ये १३ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला, तर अन्य तीन मुलांना मातीच्या ढीगाºयाखालून बाहेर काढण्यात यश आले असून, तीघांचीही प्रकृती गंभीर आहे.  
तालुक्यातील पोरज येथे पाणी पुरवठा योजनेची विहीर आहे. या विहिरीची पाणी पातळी खोल गेल्याने उन्हाळ्यात खोदकाम करण्यात आले. खोदकाम करताना बाहेर काढण्यात आलेले साहित्य विहिरीनजीक टाकण्यात आले. दरम्यान, गत तीन दिवसांत झालेल्या पावसामुळे या विहिरीची पाणी पातळी वाढली. ही पाणी पातळी पाहणयासाठी काही मुले गेली होती.  अचानक विहीर १० ते १५ फूट खचली. यामध्ये यशवंत प्रमोद हेरोळे (१३), तुषार गोपाळ हेरोळे (१२), मुकुंद आत्मराम हेरोळे (८) व यश रामदास हेरोळे (११ ) ही चार बालके दाबल्या गेली. घटनेची माहिती मिळताच प्रशासन व  गावकºयांनी तातडीने जेसीबी मशिनच्या सहाय्याने मातीचा भराव हटवून मुलांना बाहेर काढले. यामध्ये यशवंत प्रमोद हेरोळे या बालकाचा मृत्यू झाला. तर उर्वरित तीघे गंभीर जखमी झाली असून, त्यांना उचारार्था रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

Web Title: The well collapse; Three people were buried under the charge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.