बांधलेली विहीर ढासळली!
By Admin | Updated: July 18, 2016 02:29 IST2016-07-18T02:29:23+5:302016-07-18T02:29:23+5:30
गुंज येथे शेतक-याचे तीन लाखांचे नुकसान.

बांधलेली विहीर ढासळली!
सिंदखेड राजा (जि. बुलडाणा): सिंदखेड राजा तालुक्यातील गुंज येथील अल्पभूधारक शेतकर्याची विहीर संततधार पावसामुळे पूर्णपणे खचली असून, तीन लाखांचे नुकसान झाले आहे.
साखरखेर्डा परिसरात ११ ते १३ जुलैदरम्यान संततधार पाऊस पडला. गुंज परिसरातही मागील महिन्यात मुसळधार पाऊस पडल्याने त्या भागातील सतत पावसाची रिपरिप सुरू होती. या पावसात अल्पभूधारक शेतकरी समीद्राबाई ज्ञानदेव माघाडे यांची गट नंबर १११ मधील विहीर पावसाने पूर्णपणे खचली असून, विहिरीचे कठडे पूर्णत: विहिरीत पडले आहेत. समींद्राबाई माघाडे यांच्या विहिरीचे ५0 फूट खोलीकरण झालेले होते. त्यात १५ फूट सिमेंटचे कठडे बांधलेले होते. विहीर ढासळल्याने या शेतकरी महिलेचे मोठे आर्थिक नुकसान झाले. सदर विहीर विशेष घटक योजनेतून बांधण्यात आली होती. १४ जुलै रोजी पटवारी यांनी विहिरीचा पंचनामा केला असून, अल्पभूधारक शेतकरी समीद्राबाई ज्ञानदेव माघाडे यांना शासनाने विहीर खोलीकरण आणि बांधकामासाठी मदत द्यावी, अशी मागणी दत्तात्रय तुपकर, शरद वाकोडे, अनिल तुपकर यांनी केली आहे.