शिक्षणमंत्र्यांच्या वेलकमने नवचेतना!
By Admin | Updated: June 28, 2016 01:45 IST2016-06-28T01:45:55+5:302016-06-28T01:45:55+5:30
वरखेड जि.प. शाळेचा प्रवेशोत्सव ठरला विशेष; शिक्षणमंत्र्यांनी साधला व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद.

शिक्षणमंत्र्यांच्या वेलकमने नवचेतना!
चिखली (जि. बुलडाणा): जि. प. शिक्षकांचे अथक परिङ्म्रम, ग्रामस्थ व दानशूर नागरिकांचा पुढाकार, अधिकारी वर्गाचे मार्गदर्शन आणि उत्तम व्यवस्थापनाच्या बळावर सर्व सुविधांयुक्त जिल्हा परिषदेची पश्चिम विदर्भातील पहिली ह्यआयएसओह्ण स्मार्ट शाळा असलेल्या तालुक्यातील वरखेड येथील जि.प. शाळेचा प्रवेशोत्सव सध्या राज्य पातळीवर दखल पात्र ठरला. या शाळेतील विद्यार्थ्यांंंंचे खुद्द राज्याचे शिक्षणमंत्री ना. विनोद तावडे व शिक्षण सचिव नंदकुमार पालवे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून स्वागत केले. तथापि शाळेला नव्या उंचीवर नेणार्या शिक्षकवृंदांचेही भरभरून कौतुक केले.
दोन महिन्यांच्या सुट्यांनंतर २७ जून रोजी शाळा सुरू झाल्या आहेत. शाळेत आलेल्या मुलांना शाळेबद्दल गोडवा निर्माण व्हावा, तसेच नवगतांना शाळेची भीती वाटू नये, यासाठी तालुकाभरात सर्वत्र प्रवेशो त्सव व विद्यार्थ्यांंंंचे स्वागत करण्यात आले. या प्रवेशोत्सावर राज्याचे शिक्षणमंत्री ना. विनोद तावडे स्वत: लक्ष देऊन होते. त्यानुषंगाने राज्या तील पाच जिल्हय़ांतील शाळांमधील विद्यार्थ्यांंंंशी त्यांनी ह्यव्हिडीओ कॉन्फरन्सह्णद्वारे संवाद साधला. यामध्ये तालुक्यातील वरखेड येथील जि.प. शाळेचा समावेश होता. वरखेड येथील जि.प. शाळेतील शिक्षकांनी लोकसहभाग व शिक्षणाप्रती संवेदनशील असलेल्या दानशूर नागरिकांच्या मदतीने तब्बल शंभराहून अधिक नवोपक्रम राबवून खासगी शाळांनाही चपराक बसावी, अशा सर्व अत्याधुनिक सुविधा लोकसहभागाने येथे शिकणार्या विद्यार्थ्यांंंंसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. सोबतच पश्चिम विदर्भातील पहिली आय.एस.ओ. शाळा म्हणूनही बहुमान प्राप्त केला आहे. याची दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालय बुलडाणा येथील नॅशनल इन्फॉरमेटी सेंटर मध्ये आयोजित शिक्षणमंत्री ना. तावडे यांच्या व्हिडीओ कॉन्फरन्ससाठी या शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांची निवड करण्यात आली होती. या व्हिडीओ कॉन्फरन्सदरम्यान पाच जिल्हय़ांतील शाळेतील विद्यार्थ्यांसह बुलडाणा जिल्हय़ातील वरखेड येथील जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांशी शिक्षणमंत्री ना. तावडे यांच्यासह शिक्षण सचिव नंदकुमार पालवे यांनी संवाद साधला. यामध्ये वरखेड शाळेतील नेहा गजानन लोढे, श्वेता अंबादास गवई, नम्रता संदीप कस्तुरे, वेदांत रमेश कणखर, वैभव दत्तात्रय चिंचोले, कार्तिक उत्तम पर्हाड या इयत्ता ५ ते ७ वीच्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता.