विदर्भ साहित्य संमेलन घोषणेच शहर वासियांकडून स्वागत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:33 IST2021-02-05T08:33:47+5:302021-02-05T08:33:47+5:30

सिंदखेडराजा: पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी यंदाच विदर्भ साहित्य संमेलन मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे आयोजीत करण्याच्या घोषनेच सिंदखेड वासियानी स्वागत ...

Welcome to Vidarbha Sahitya Sammelan! | विदर्भ साहित्य संमेलन घोषणेच शहर वासियांकडून स्वागत!

विदर्भ साहित्य संमेलन घोषणेच शहर वासियांकडून स्वागत!

सिंदखेडराजा: पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी यंदाच विदर्भ साहित्य संमेलन मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे आयोजीत करण्याच्या घोषनेच सिंदखेड वासियानी स्वागत केले आहे. शनिवारी बुलडाणा येथील एका कार्यक्रमात पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी साहित्यिक प्रा.नरेंद्र लांजेवार यांच्या उपस्थितीत ही घोषणा केली.संमेलनाचे सिंदखेडराजा येथे आयोजन करा त्यासाठी विदर्भ साहित्य संघाला सवोर्तोपरी सहकार्य केले जाईल असेही डॉ शिंगणे यांनी सांगितले होते. दरम्यान, रविवारी सकाळी डॉ शिंगणे हे सिंदखेडराजा येथे आले असता सर्व पक्षीय नेत्यांनी त्यांची भेट घेवून संमेलनाच्या संदर्भात केलेल्या घोषणेचे स्वागत केले याच बैठकीत डॉ शिंगणे यांच्या अभिनंदनाचा एकमुखी ठराव करण्यात आला. आम्ही साहित्य संमेलन ऐकत आलो,पाहत आलो परंतु सिंदखेडराजा येथे होणारे हे संमेलन आम्हाला प्रत्यक्ष अनुभवता येणार असल्याच्या प्रतिक्रीया सिंदखेड राजा येथे उमटत आहेत.

कोट...

-संमेलनाच्या माध्यमातून विचारांची देवाण घेवाण होणार आहे.हे साहित्य संमेलन सिंदखेडराजा च्या इतिहासात नोंदले जाणार असल्याचा आनंद आहे.

- अ‍ॅड. नाझेर काजी जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

--------------

Web Title: Welcome to Vidarbha Sahitya Sammelan!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.