‘श्रीं’चे श्रद्धापूर्वक स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 01:10 IST2017-07-31T01:09:47+5:302017-07-31T01:10:10+5:30
शेगाव: श्री संत गजानन महाराज संस्थानच्यावतीने आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे काढण्यात आलेली पायदळ वारी पालखीसह रविवारी शेगावात परतली.

‘श्रीं’चे श्रद्धापूर्वक स्वागत
गजानन कलोरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
शेगाव: श्री संत गजानन महाराज संस्थानच्यावतीने आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे काढण्यात आलेली पायदळ वारी पालखीसह रविवारी शेगावात परतली. दोन महिन्यांच्या अथक प्रवासानंतर परतलेल्या वारकºयांचे भव्य स्वागत संस्थानसह शेगावकरांकडून करण्यात आले. यावेळी गजाननाच्या जयघोषाने संतनगरी दुमदुमली होती.
दरवर्षीप्रमाणे पंढरपूर येथील आषाढी एकादशी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी संत गजानन महाराजांची पालखी शेगाव येथून ३१ मे २०१७ रोजी निघाली होती. ५०० वारकºयांसह निघालेल्या या पालखी सोहळ्याचे परतीच्या प्रवासादरम्यान ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत झाले. शनिवारी खामगावात दाखल झाल्यानंतर वारकºयांचे स्वागत व मुक्काम झाला. त्यानंतर रविवारी पहाटे पालखी शेगावकडे मार्गस्थ झाली. या पालखीसमवेत खामगाव येथून हजारो भाविक पायदळ वारीत सहभागी झाले होते. त्यामुळे खामगाव ते शेगाव मार्गावरील वाहतूक दुपारपर्यंत बंद ठेवण्यात आली. सदर पालखी संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय येथे पोहचल्यानंतर संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त शिवशंकरभाऊ पाटील यांनी स्वागत केले. यावेळी श्रीकांतदादा पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य सोमाणी, नारायणदास पाटील, गोविंद कलोरे, पंकज शितुत, अशोक देशमुख, राजेंद्र शेगोकार, मधुकर घाटोळ आदींची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. रमेशचंद्र डांगरा यांच्या हस्ते रजत मुखवट्याचे पूजन व आरती करण्यात आली. तसेच गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय व श्री गजानन महाराज इंग्लिश स्कूलच्यावतीने वारकºयांना भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. यानंतर पालखी व सोबतच्या भाविक भक्तांसाठी श्री गजानन वाटिका येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी संस्थानचे विश्वस्त नीळकंठदादा पाटील यांनी पालखीचे स्वागत केले. यावेळी तहसीलदार गणेश पवार यांनीही दर्शन घेतले. दुपारी २ वाजता श्रींची पालखी नगरपरिक्रमेकरिता मुख्य मार्गाने मार्गस्थ झाली. यावेळी शहरवासीयांनी दर्शनाकरिता एकच गर्दी केली होती. टाळमृदंगाच्या गजरात गजाननाच्या जयघोषाने वातावरण भक्तिमय बनले होते. ठिकठिकाणी पालखीचे स्वागत करण्यात आले. पालखी मार्गावर व मंदिर परिसरात विविध आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. श्रींच्या पालखी सोहळ्यानिमित्त शेगावात लाखो भाविकांनी गर्दी केली होती. खामगाव परिसरच नव्हे तर बुलडाणा जिल्ह्यातील कानाकोपºयातून व अन्य जिल्ह्याातील भाविकांनीसुद्धा संतनगरीत हजेरी लावली. त्यामुळे पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
पालखीतील शिस्त ठरली आकर्षण
सदर पालखी सोहळ्यातील वारकºयांची शिस्त आकर्षण ठरली. गण गण गणात बोते, राधेकृष्ण कृष्णराधे, नाम विठ्ठलाचे व गजाननाचे, माथी कुमकुम टिळा, मुखी हरिनाम कंठी तुळशी माळ, अशा जयघोषात खांद्यावर पताका घेतलेले शेकडो वारकरी शिस्तबद्ध पद्धतीने पावली करतानाचे दृश्य डोळ्यात साठवण्यासारखे होते.