दूध पिऊन नवीन वर्षाचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:23 IST2021-01-01T04:23:33+5:302021-01-01T04:23:33+5:30

शिवसंग्राम संघटनेचे सामाजिक कार्यकर्ते गणेश भोसले यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दूध वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी आ. संजय गायकवाड, ...

Welcome to the new year by drinking milk | दूध पिऊन नवीन वर्षाचे स्वागत

दूध पिऊन नवीन वर्षाचे स्वागत

शिवसंग्राम संघटनेचे सामाजिक कार्यकर्ते गणेश भोसले यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दूध वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी आ. संजय गायकवाड, शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष संदीप गायकवाड यांच्या हस्ते युवकांना दूध वाटप करण्यात आले. ३१ डिसेंबर रोजी सरत्या वर्षाला निरोप व २०२१ येणाऱ्या वर्षाचे स्वागत करताना दारू नाही, तर दूध प्या आणि सशक्त होऊन भारत घडवा. नवीन वर्षाचे स्वागत धुंदीत नव्हे, तर शुध्दीत करा या उदात्त हेतूने शिवसंग्राम संघटनेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी युवकांना एक समाज उपयोगी संदेश दिला. यावेळी डॉ. राजेश उबरहंडे, डॉ. दुर्गासिंग जाधव, डॉ. शरद काळे, डॉ. सचिन सरकटे, डॉ. संजय गवळी, डॉ.सचिन किनगे, दत्ता पाटील, अजय बिलारी, राजेंद्र काळे, अरुण जैन, संजय जाधव, शेख वसीम, युवराज वाघ, धर्मवीर आखाडा अध्यक्ष कुणाल गायकवाड, दीपक तुपकर, गोटु शर्मा, अनुप श्रीवास्तव, सुरेश दिशागज यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी संग्राम संघटनेचे तालुका अध्यक्ष संजय चव्हाण, शहर सचिव संदीप सपकाळ, ज्येष्ठ कार्यकर्ते ज्ञानेश्वर सुरपाटणे, आशिष उज्जैनकर, मृदूल काळवाघे, संतोष सनई, विपीन चिराणीया, अतीश मोरे, अजय घुले, संजय पंडितकर, विजय कल्याणकर, शुभम पुरभे, सतिष शिंदे, कल्याण शिराळ, सुनील मोरे, अमोल पवार, शनिराज सौदे, मंगेश राजपूत उपस्थित होते.

Web Title: Welcome to the new year by drinking milk