श्री संत मुक्ताबाईंच्या पालखीचे स्वागत

By Admin | Updated: June 17, 2016 02:21 IST2016-06-17T02:21:05+5:302016-06-17T02:21:05+5:30

श्री संत मुक्ताबाईंच्या पालखीचे राजूर घाट चढून बुलडाणानगरीत आगमन.

Welcome to Mr. Sant Muktabai's Palkhi | श्री संत मुक्ताबाईंच्या पालखीचे स्वागत

श्री संत मुक्ताबाईंच्या पालखीचे स्वागत

बुलडाणा : मुखी विठ्ठलनामाचा गजर करीत उन्ह, वारा, पावसाची तमा न बाळगता श्री क्षेत्न पंढरपूर येथे विठ्ठलाच्या भेटीसाठी निघालेल्या श्री संत मुक्ताबाईंच्या पालखीचे १६ जून रोजी राजूर घाट चढून बुलडाणानगरीत आगमन झाले. यावेळी भाविकांनी दिंडीचे स्वागत करून मनोभावे दर्शन घेतले. श्री क्षेत्न मुक्ताईनगर येथून १0 जून रोजी श्री संत मुक्ताबाईंची पालखी व पायदळ दिंडी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. या पायी दिंडीमध्ये खान्देश, विदर्भ व मध्यप्रदेशातील जवळपास ७00 भाविक सहभागी झाले आहेत, शिवाय सोबत संस्थानची दोन वाहने, पाण्याचे टँकर व आरोग्य विभागाचे एक पथक कार्यरत आहे. १५ जून रोजी मोताळा येथे मुक्काम करून या पालखीचे १६ जून रोजी राजूर घाट चढून बुलडाणानगरीत आगमन झाले. शहरात आगमन होताच असंख्य भाविकांनी पालखीचे मनोभावे दर्शन घेतले. जयस्तंभ चौकातील हनुमान मंदिरात ही पालखी मुक्कामी राहणार आहे. रात्नी ७ ते ८ या दरम्यान कीर्तन होणार आहे. दिंडीचालक म्हणून हभप रवींद्र महाराज हरणे हे काम पाहत आहेत. १७ जून रोजी सकाळी ७ वाजता पालखीचे प्रस्थान होऊन पालखी येळगावकडे प्रस्थान करणार आहे. या पालखीमुळे शहरात मंगलमय वातावरण पसरले आहे.

Web Title: Welcome to Mr. Sant Muktabai's Palkhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.