नागपूरच्या शिवभक्तांची सायकल वारीचे स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:34 IST2021-03-26T04:34:41+5:302021-03-26T04:34:41+5:30
नागपूर ते रायगड असा आठशेपेक्षा जास्त किलोमीटर प्रवासाचा संकल्प करून हे युवक निघाले आहे. सिंदखेडराजा येथे त्यांनी जिजाऊंचे ...

नागपूरच्या शिवभक्तांची सायकल वारीचे स्वागत
नागपूर ते रायगड असा आठशेपेक्षा जास्त किलोमीटर प्रवासाचा संकल्प करून हे युवक निघाले आहे. सिंदखेडराजा येथे त्यांनी जिजाऊंचे दर्शन घेतले. जिजाऊ सृष्टी येथे भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विनोद वाघ, अविनाश चव्हाण, लखन देशमुख यांनी सर्व सायकलस्वार शिवभक्तांचे स्वागत केले. या सायकल यात्रेत वर्षा घटोळे, रक्षा राहुलकर, प्रियंका वैद्य, धनश्री भोयर, नेहारिका लांडगे, सुमित शरणागत, अविनाश कटरे, शुभम मुंडले, निशांत निंदेकर, अनिरुद्ध सोलर, राजू मुन्ने यांचा समावेश आहे. या यात्रेत रुग्णवाहिका सोबत आहे.
अंगणवाड्यांसाठी निधीचा खोडा
किनगाव राजा : सिंदखेड राजा तालुक्यातील अनेक अंगणवाड्यांची अवस्था दयनीय झाली आहे. अंगणवाड्यांची इमारती मंजूर झालेल्या असताना अद्याप इमारती उभ्या राहिल्या नाहीत. अंगणवाडी इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी निधीचा खोडा आहे.