नियमांचे पालन करून उडविला जातो लग्नांचा बार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:35 IST2021-04-27T04:35:12+5:302021-04-27T04:35:12+5:30
हिंदू धर्म परंपरेनुसार तुळशी विवाह झाला की लग्नसराईला सुरुवात होते. सोयरीक करून कुंकू टिळा उरकून मार्च महिन्यानंतर शाळा कॉलेजला ...

नियमांचे पालन करून उडविला जातो लग्नांचा बार
हिंदू धर्म परंपरेनुसार तुळशी विवाह झाला की लग्नसराईला सुरुवात होते. सोयरीक करून कुंकू टिळा उरकून मार्च महिन्यानंतर शाळा कॉलेजला सुट्ट्या लागत असल्याने व शेतकऱ्याची कामेसुद्धा पाहिजे त्या प्रमाणात राहात नसल्याने मार्चनंतर धुमधडाक्यात लग्न करण्याकरिता तिथी निश्चित केल्या होत्या. परंतु गतवर्षी कोरोना संसर्ग आजाराने कहर केल्यामुळे शासनाने नागरिकांचे आरोग्य अबाधित राहावे, म्हणून लॉकडाऊन जाहीर करून धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमावर बंदी घातली. लग्नसमारंभातसुद्धा ठरावीक अटी नियम घालून दिल्याने धुमधडाक्यात लग्न करण्याची इच्छा असूनसुद्धा तसे करता येत नसल्याने पुढच्या वर्षी करू असे ठरले होते. काहींनी कोरोना महामारीचे नियम पाळून लग्न उरकले आहे. तर काही वर-वधू पित्यांनी कुंकू टिळे लावले होते. काहींनी लग्न धुमधडाक्यात करता येत नसल्याने रद्द केले. परंतु पुन्हा यावर्षीसुद्धा दोन महिन्यांपासून कोरोना संसर्ग आजाराच्या दुसऱ्या लाटेने जिल्ह्यासह ग्रामीण भागातसुद्धा कहर केला आहे. रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे शासनाने पुन्हा धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमावर बंदी घालून लग्न समारंभाकरिता काही अटी व नियम घातले आहेत. उपवर वरांचा हिरमोड झाला असून एका गायकाने गायलेल्या गाण्यातील ओळीप्रमाणे हुंडा नको मामा फक्त मुलगी द्या मला अशी सर्वसाधारण वरांची परिस्थिती निर्माण झाल्याचे उपवर वर चर्चा करताना दिसत आहेत.