वाहून आलेल्या वाहनात आढळले शस्त्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:40 IST2021-09-24T04:40:34+5:302021-09-24T04:40:34+5:30

साखरखेर्डा : राहेरी शेवली मार्गावर असलेल्या वर्दडी बु येथील नदीच्या पुरात एक जीप २२ सप्टेंबर राेजी वाहून आली हाेती़ ...

Weapons found in the vehicle | वाहून आलेल्या वाहनात आढळले शस्त्रे

वाहून आलेल्या वाहनात आढळले शस्त्रे

साखरखेर्डा : राहेरी शेवली मार्गावर असलेल्या वर्दडी बु येथील नदीच्या पुरात एक जीप २२ सप्टेंबर राेजी वाहून आली हाेती़ या जीपची पाेलिसांनी पाहणी केली असता त्यामध्ये लाेखंडी पहार, कटर, हाताेडा, गॅस कटर आदी साहित्य आढळले़ त्यामुळे, दराेडेखाेरांनी ही जीप लंपास करून नदीपात्रात साेडून दिल्याचा संशय पाेलिसांनी व्यक्त केला आहे़ ही जीप नंदुरबार जिल्ह्यातून २१ सप्टेंबर राेजी चाेरी गेल्याची तक्रार आहे़

तालुक्यातील वर्दडी बुद्रूक येथील नदीला २२ सप्टेंबरला पूर आला हाेता़ या पुरात एक वाहन वाहून आल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. याची माहिती ग्रामस्थांनी किनगावराजा पोलिसांना दिली़ जीप क्र.एमएच १८ डब्ल्यू ४४८२ वाहून गेल्याची घटना घडल्याचे निदर्शनास आले. मध्यरात्री वाहून गेलेल्या जीपमुळे तर्कवितर्कांना उधाण आले हाेते.

दूरपर्यंत वाहून गेलेल्या बोलेरो जीपमध्ये एकही प्रवासी दिसत नव्हता. गाडीवर असलेल्या मोबाइल क्रमांकावर पोलीस व स्थानिक नागरिकांनी संपर्क केला असता गाडीचा मूळ मालक नंदुरबार जिल्ह्यातील असल्याचे समारे आले. तसेच त्यांचे नाव सुधीर व्यंकट गावीत असल्याचे तपासात स्पष्ट झाले. त्यांची जीप २१ सप्टेंबर रोजी चोरीला गेले असून नंदुरबार पोलीस स्टेशनला त्यांनी तक्रारही दिली आहे़ या माहितीनुसार किनगाव राजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार साहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज रबडे यांनी स्थानिक लोकांच्या मदतीने त्याची झडती घेतली असता त्यामध्ये लोखंडी पहार, कटर, हातोडा , गॅस कटर अशा विविध लोखंडी वस्तू आढळून आल्या़ दराेडखाेरांनी वाहन लंपास करून नदीपात्रात ढकलल्याचा संशय व्यक्त हाेत आहे़ यावेळी पोलीस हेडकॉन्स्टेबल रमेश गोरे, श्रावण डोंगरे व सलिम परसुवाले यांच्यासह स्थानिक नागरिक यावेळी घटनास्थळी हजर होते़

Web Title: Weapons found in the vehicle