शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

पाणीदार झालेल्या गावांची समृद्धीकडे वाटचाल - ब्रम्हदेव गिऱ्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2020 11:58 AM

पानी फाऊंडेशनचे मोताळा तालुका समन्वयक ब्रम्हदेव गिऱ्हे यांच्याशी संवाद...

- योगेश फरपट खामगाव : वॉटरकप स्पर्धेप्रमाणेच गावकºयांनी समृद्ध गाव स्पर्धेत उत्स्फुर्त सहभागी होत गाव समृद्ध करण्यासाठी पुढे येण्याची गरज  असल्याचे मत पानी फाऊंडेशनचे मोताळा तालुका समन्वयक ब्रम्हदेव गिऱ्हे यांनी व्यक्त केले.  

पानी फाउंडेशनचा कोणता उपक्रम सुरु आहे?  सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा ही यावेळेस पासून बंद झाली आहे. यावेळेस सत्यमेव जयते ‘समृद्ध ग्राम स्पर्धा’ ही महाराष्ट्रातील ४० तालुक्यात सुरु केली आहे. यामध्ये बुलडाणा जिल्हयातील मोताळा हा एकमेव तालुका आहे. 

मोताळा तालुक्यातील कोणत्या गावांचा समावेश आहे? मागील दोन वर्षाच्या वॉटर कप स्पर्धेमध्ये किमान ३० गुणांची कामे करणारी २० गावे या स्पर्धेसाठी पात्र आहेत. यामध्ये सिंदखेड, लपाली, पोफळी, पोखरी, जयपूर, जनुना, चिंचखेडनाथ, शेलापूर खुर्द, उबाळखेड, खामखेड, दाभा, कोºहाळाबाजार, महाळूंगी जहॉगिर, चिंचपूर, भोरटेक, तिघ्रा या गावांचा समावेश आहे. 

सद्याची काय स्थिती आहे? माहे जानेवारी ते फेब्रुवारी २०२० या कालावधीत उपरोक्त पात्र गावातील शाळकरी विद्यार्थ्यांसोबत निसर्गाची धमाल शाळा हा सहा दिवसीय उपक्रम राबविण्यात आला. त्यामध्ये प्रामुख्याने विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाविषयी आपुलकीचे व प्रेमाचे नाते निर्माण व्हावे यादृष्टीने माती, पाणी, वृक्षलागवड, हवामान बदल, आदी विषयावर मार्गदर्शन करण्यात येवून जाणिव जागृती करण्यात आली. 

पुढील कामाची दिशा काय असेल? मार्चच्या दुसºया आठवड्यापासून स्पर्धेसाठी पात्र गावांच्या गावकºयांचे पानी फाउंडेशनमार्फत चार दिवसीय निवासी प्रशिक्षण विविध बँचेचमध्ये घेणार आहोत. तद्नंतर गावात प्रत्यक्ष जल व मृदसंधारणाच्या कामाला सुरवात केली जाईल. यासाठी जिल्हाधिकारी डॉ. सुमन चंद्रा, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. षण्मुगराजन यांचे मार्गदर्शनात जिल्हा प्रशासन, तालुका प्रशासन व स्थानिक गावचे सरपंच व ग्रामस्थ स्पर्धेसाठी तयार आहेत. समृद्ध गाव स्पर्धेसाठी जिल्हयातून आपल्याच गावाची निवड झाली आहे, याची जाणिव ठेवत पानी फाउंडेशन व प्रशासनाच्या माध्यमातून आपले गाव अधिक समृद्ध करून घेण्यासाठी पुढाकार घ्यावा व मिळालेल्या संधीचे सोने करावे. आगामी काळात होणाºया सर्व प्रशिक्षणात पुर्ण क्षमतेने गावांनी सहभागी होण्याची गरज आहे. 

नेमकी ही स्पर्धा कशी असेल? ही स्पर्धा १८ महिन्यांची असून यामध्ये प्रामुख्याने मृदा आणि जलसंधारण,  जलव्यवस्थापन आणि पाण्याचा ताळेबंद, जंगल आणि वृक्षांची लागवड व वाढ करणे, पौष्टिक गवताचे संरक्षित कुरणक्षेत्र तयार करणे, मातीची आरोग्य आणि पोत सुधारणे, प्रत्येक कुटुंबाचे उत्पन्न वाढविण्यासाठी आधार तयार करणे या कामांचा या स्पर्धेत समावेश असेल.

टॅग्स :Water Cup Competitionवॉटर कप स्पर्धाkhamgaonखामगावinterviewमुलाखत