खामगांवात तीन दिवसाआड पाणी पुरवठा

By Admin | Updated: August 4, 2014 23:53 IST2014-08-04T23:52:59+5:302014-08-04T23:53:28+5:30

विविध वस्त्यांमध्ये तीन दिवसाआड पाणी पुरवठा करण्याच्या ठरावाला विशेष सभेत मंजुरी देण्यात आली.

Water supply for three days in Khamgaon | खामगांवात तीन दिवसाआड पाणी पुरवठा

खामगांवात तीन दिवसाआड पाणी पुरवठा

खामगाव : शहरातील विविध वस्त्यांमध्ये तीन दिवसाआड पाणी पुरवठा करण्याच्या ठरावाला आज ४ ऑगस्टरोजी विशेष सभेत मंजुरी देण्यात आली. सफाई कामगारांच्या नियुक्तीवरून सभेत चांगलेच वादंग निर्माण झाले. शहरातील विविध विकास कामांना मंजुरी देण्यासाठी पालिकेची विशेष सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष अशोकसिंह सानंदा यांच्या अध्यक्षतेत आयोजित करण्यात आली. या सभेत शहर विकासाच्या विविध ठरावांना मान्यता देण्यात आली. यामध्ये दलित वस्तीत अनुसुचित जाती व नबबौद्ध घटकांसाठीच्या वैयक्तीक शौचालय योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचा हिस्सा पालिकेच्या निधीतून भरून योजनेला गती देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. त्याचप्रमाणे दलित वस्तीत भव्य बहुउद्देशिय सभागृह बांधण्यासाठी एक कोटी रूपयांसह ४ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांना मंजुरी देण्यात आली. खामगाव शहरातील साफसफाई, नाली सफाई करिता लागणारे मनुष्यबळ कंत्राटी पध्दतीने देऊन खामगाव शहर स्वच्छतेतून समृध्दीकडे नेण्याचा ठराव, घनकचरा व्यवस्थापना अंतर्गत शहरातील कचर्‍याचे ढिग उचलून त्याची कंत्राटी पध्दतीने विल्हेवाट लावण्याकरिता निविदा प्रक्रिया राबविण्याचा ठराव, वृक्षारोपण तसेच वृक्ष संवर्धन करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या अंदाजपत्रकाला मान्यता देणे, महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान अभियान सन २0१४-१५ अंतर्गत खामगाव शहरामध्ये खुले नाट्यगृह उभारण्यासह विविध विकास कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. या सभेला उपाध्यक्ष वैभव डवरे, संतोष देशमुख, सुनील जयपुरीया, नगरसेविका सौ.अलकादेवी सानंदा, सौ.सरस्वतीताई खासने, सौ.माधुरीताई ताकवाले, सौ.अर्चनाताई टाले आदी नगरसेवक उपस्थित होते.

Web Title: Water supply for three days in Khamgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.