नळाद्वारे रक्तमिश्रीत पाण्याचा पुरवठा
By Admin | Updated: February 3, 2015 00:16 IST2015-02-03T00:16:20+5:302015-02-03T00:16:20+5:30
देऊळगावराजा येथील प्रकार.

नळाद्वारे रक्तमिश्रीत पाण्याचा पुरवठा
देऊळगावराजा (जि. बुलडाणा): शहरातील महेबूबपुरा भागातील नळाद्वारे अचानक रक्तमिश्रीत पाणी आल्याने नागरिकांमध्ये एकच घबराट निर्माण झाली. यासंदर्भात नगरपालिकेच्या अधिकार्यांनी तातडीने पाहणी केल्यानंतर पाईप लिकेजमुळे रक्तमिश्रीत पाणी आल्याचे निदर्शनास आले.
येथील महेबूबपुरा भागात ३१ जानेवारी रोजी नगरपालिकेने नळाला पाणी सोडले असता सुरूवातीला नळाचे चक्क लाल रंगाचे रक्तमिश्रीतपाणी येवू लागले, यामुळे नागरिकांमध्ये एकच घबराट निर्माण झाली. याची माहिती तातडीने नगरपालिकेला देण्यात आली. यावेळी न.पा. पाणी पुरवठा विभागाचे कनिष्ट पर्यवेक्षक राहुल मापारी व न.प. चे कर्मचारी संजय वालेकर यांनी या भागाची पाहणी केली असता या परिसरात बर्याच ठिकाणी जलवाहिन्यात लिकेज निघाले, तर अनेक ठिकाणी नळाला तोट्या नाहीत. त्यामुळे हा प्रकार घडल्याचे अधिकार्यांनी सांगितले.
दरम्यान, नगरपालिकेच्या आरोग्य विभाग व पाणीपुरवठा विभागाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. महेबूबपुरा भागातील नागरिकांना दहाव्य दिवशी पाणीपुरवठा करण्यात येतो, त्यामुळे या भागातील नगरिकांमध्ये न.प. विरुद्ध रोष व्यक्त होत आहे. दरम्यान, पाईप लाईनचे लिकेज काढण्याचे काम नगरपालिकेच्यावतीने करण्यात येणार आहे, अशी माहिती कनिष्ट पर्यवेक्षक राहुल मापारी यांनी दिली. या लिकेजमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.