खामगावला पाणीटंचाईची झळ !

By Admin | Updated: May 20, 2014 23:52 IST2014-05-20T23:18:50+5:302014-05-20T23:52:29+5:30

शहरात मोठय़ा प्रमाणात पाणीटंचाईची झळ दिसून येत आहेत.

Water-scarred water! | खामगावला पाणीटंचाईची झळ !

खामगावला पाणीटंचाईची झळ !

खामगाव: शहरात मोठय़ा प्रमाणात पाणीटंचाईची झळ दिसून येत आहेत. यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधीकरण, नगर परिषद प्रशासन आणि लोकप्रतिनिधींबाबत नागरीकांचा रोष मोठ्या प्रमाणात व्यक्त होत आहे. शहराला दर पाच-सहा दिवसाआड पाणीपुरवठा होत असून वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम कधी पुर्णत्वास येईल याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. मात्र या वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम लालफितशाहीत अडकले आहे. खामगाव शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून सद्यस्थितीत ती ९५ हजाराच्या जवळपास गेली आहे. शहरात १0 हजारापर्यंत नळधारक असून ४00 सार्वजनिक नळ आहेत. ज्ञानगंगा धरणातून शहराला पाणीपुरवठा केला जात आहे. वामन नगर येथे १७ लाख लिटर तर घाटपुरीमध्ये २१ लाख लिटर पाण्याची क्षमता असलेल्या दोन पाण्याच्या टाक्या उभारल्या आहेत. तर खामगाव शहरात या दोन टाक्यावरुन जवळपासच्या भागात पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तसेच शहरातील विविध भागात ४00 पेक्षा जास्त हातपंप असून यामधील ३५0 पर्यंत हातपंप सद्या सुरु आहे. बंद पडलेल्या हातपंपाचे दुरुस्तीसाठी पथक कधी येणार याची वाट पहावी लागत आहे. शहरात दररोज ६0 ते ६५ लाख लिटर पाण्याची गरज आहे. मात्र शहरात जुनीच वितरण व्यवस्था असल्यामुळे वाढलेली भरमसाठ लोकसंख्या पाहता पाणी पुरवठा कमी पडत आहेत. पाच-सहा दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. खामगाव शहरात वाढला लोकसंख्येबरोबर पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ६२ कोटी रुपयाची वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे. गेल्या तीन ते चार वर्षापासुन शिर्ला येथील मन प्रक ल्पापासून या योजनेचे काम सुरु आहे. आतापर्यंत या योजनेसाठी ४४ कोटी रुपये खर्च झाला आहे. मात्र ही योजना पुर्णत्वास जाण्यासाठी राजकीय व प्रशासकीय पातळीवर अनेक अडथडे निर्माण होत असल्याचे वाढीव पाणीपुरवठा योजना मात्र फितशाहीत अडकली आहे.

Web Title: Water-scarred water!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.