अभयारण्यातील पाणवठे पडले कोरडे
By Admin | Updated: April 10, 2017 15:51 IST2017-04-10T15:51:58+5:302017-04-10T15:51:58+5:30
ज्ञानगंगा अभयारण्यासह वनपरिक्षेत्रातील पानवठे आटल्याने जंगलात पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले आहे.

अभयारण्यातील पाणवठे पडले कोरडे
बुलडाणा : ज्ञानगंगा अभयारण्यातील पाणवठे कोरडे पडले असून वन्य प्राणी पाण्यासाठी भटकंती करीत आहे. या पाणवठ्यांमध्ये पाणी भरण्याची जबाबदारी असलेले वन विभागाचे अधिकारी मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहे. ज्ञानगंगा अभयारण्यासह वनपरिक्षेत्रातील पानवठे आटल्याने जंगलात पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले आहे. यासाठी 81 कृत्रिम पानवठे तयार करण्यात येणार आहेत. मात्र वनपरिक्षेत्रातील जनावरांची संख्या पाहता पानवठे कमी असून जंगलात पाणीटंचाईचे सावट आहे.
गतवर्षी मुबलक प्रमाणात पाऊस झाला असला तरीही उन्हाच्या दाहकतेमुळे जलस्त्रोत आटले आहेत. परिणामी प्राण्यांची भिस्त पाणवठ्यांवर आहे. मात्र पाणवठेही कोरडे पडले आहेत.