शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
2
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
3
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
4
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
5
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
6
आइस्क्रीममध्ये मानवी बोट; उत्पादन करणाऱ्या डेअरीला अखेर FDAचा दणका
7
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
8
निवृत्तीचे वय ६० करण्यास राज्य सरकार सकारात्मक
9
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
10
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
11
आजचा अग्रलेख: विधानसभेसाठी ‘स्मार्ट’ खेळी
12
अण्णासाहेब पाटील महामंडळातील ६१ कर्मचाऱ्यांना कामावरून काढले
13
नीटची संस्था ‘नीट’ करणार; घोळ करणाऱ्यांना सोडणार नाही: सरकार उचलणार कठाेर पाऊल
14
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
15
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
16
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
17
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
18
दफन केलेले मुलाचे प्रेतच गायब; दिसला फक्त खड्डा!
19
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
20
ताजा विषय: शिक्षकांना मोठा पगार मिळाला तर पोटात का दुखते?

शाळांमध्ये पाण्याचा ठणठणाट

By admin | Published: July 13, 2014 8:27 PM

पावसाचा फटका: विद्यार्थी संख्या १ लाख ९२ हजार

धाड : जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक अशा एकूण १ हजार ४४८ शाळा असून जवळपास १ लाख ९२ हजारांवर विद्यार्थी संख्या आहे. या पैकी अनेक शाळांमध्ये पाण्याचा ठणठणाट असल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. गत दशकात यावर्षी प्रथमच जुलै महिना कोरडा जात आहे. जिल्ह्यात कुठेही दमदार पाऊस नाही. हवेतील आद्र्रता कमी तर उन्हाची तिव्रता अधिक असल्याने उन्हाळ्यापेक्षाही जास्त चटके बसत आहेत. शाळेत बसविण्यात आलेले पिण्याच्या पाण्यासाठी हातपंप कोरडे पडले आहेत. घरुन पाण्याने भरुन आणलेल्या बॉटल शाळेत येईपर्यंतच गरम झाल्यामुळे पाणी पिण्यायोग्य राहत नाही. शाळेतील पिण्याच्या पाण्याच्या टाक्या उन्हाळ्यापासून कोरड्या आहेत. काही जि.प.शाळेत असणार्‍या हातपंपाना पाणी असले तरी त्याची पातळी खोल गेल्याने मुलांची झुंबड उडते. अशीच अवस्था माध्यमिक शाळांची असून पाणी आणावे कुठून हा प्रश्न मुख्याध्यापकासमोर उभा आहे.** पोषण आहार योजनेलाही फटकाप्रत्येक शाळेत असलेली पोषण आहार योजनेलाही पाण्याचा फटका बसला आहे. हा आहार शिजवण्याएवढा पाणीसाठा उपलब्ध करुण्याची कसरत मुख्याध्यापकांना करावी लागत आहे.** दरवर्षी जुनच्या पहिल्या आठवड्यात दाखल होणारा पाऊस महिना उलटला तरी यावर्षी पडेना. टिनपत्राच्या खोलीतील शिक्षण लहान मुलांना त्रास देणारे ठरत असून पाण्याअभावी प्रचंड हाल होत आहेत. प्रशासनाने पाऊस पडेपर्यंत सकाळच्या सत्रातील शाळा सुरू कराव्यात. - पंजाब टेकाळे, मुख्याध्यापक, मपुमा शाळा कुंबेफळ.** पावसाने हुलकावणी दिल्यामुळे जमीनीमधील पाण्याची पातळी खालावली आहे त्यामुळे शांळामधील हातपंप व नळ योजनांना अपुरे पाणी येत आहे. याबाबत प्रत्येक शाळानिहाय आढावा घेऊन उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला जाईल. - वैशाली ठग, शिक्षणाधीकारी, प्राथमिक