पक्ष्यांसाठी लावण्यात आलेले पाण्याचे पात्र चोरी
By Admin | Updated: March 22, 2017 01:34 IST2017-03-22T01:34:20+5:302017-03-22T01:34:20+5:30
विघ्नसंतोषी लोकांनी यातील दोन पात्र चोरून नेले असल्याची बाब उघडकीस.

पक्ष्यांसाठी लावण्यात आलेले पाण्याचे पात्र चोरी
बुलडाणा, दि. २१- होळी या सणाचे औचित्य साधून ज्ञानगंगा अभयारण्यात १५ ठिकाणी वनातील पक्ष्यांचा विचार करून पाण्यासाठी मातीचे पात्र १२ मार्च रोजी लावण्यात आले होते; परंतु काही विघ्नसंतोषी लोकांनी यातील दोन पात्र चोरून नेले असल्याची बाब उघडकीस आली.
उन्हाळ्यात वनातील पशू पक्ष्यांचे पाण्यासाठी हाल होऊ नयेत म्हणून अनोख्या पद्धतीने होळी साजरी केली. तसेच वन्यजीवरक्षक सोयरे यांनी, बुलडाणा येथून खामगावला जाताना जेथे आपल्याला पाण्याचे पात्र दिसतील त्या पात्रामध्ये पाणी टाका, असे आवाहन केले होते. काही पक्षीप्रेमी आणि वन्यजीव प्रेमी मोठय़ा हौशीने या पात्रामध्ये पाणी टाकू लागले. ज्ञानगंगा अभयारण्यात विविध १५ ठिकाणी पक्ष्यांना पिण्याच्या पाण्याचे पात्र लावले; परंतु काही विघ्नसंतोषी लोकांनी या १५ पात्रामधून दोन पात्र चिंध्यासहित घेऊन गेले आहेत; मात्र या ठिकाणी पुन्हा पात्र लावण्यात येणार असल्याची माहिती ह्यवन्यजीव सोयरेह्ण या संस्थेने दिली आहे.