शासकीय कार्यालयातील पाणी धोकादायक

By Admin | Updated: November 7, 2014 23:26 IST2014-11-07T23:26:11+5:302014-11-07T23:26:11+5:30

दिव्याखाली अंधार : कर्मचार्‍यांना बाटलीबंद पाण्याचा आधार.

Water from the government office is dangerous | शासकीय कार्यालयातील पाणी धोकादायक

शासकीय कार्यालयातील पाणी धोकादायक

बुलडाणा : येथील जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, पंचायत समिती, जिल्हा परिषद, प्रशासकीय इमारत सर्वच शासकीय कार्यालयात पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था नाही. त्यामुळे शहरातील शासकीय कार्यालय पाणी असतानाही कर्मचारी तहानलेले असल्याचे भासते. शिवाय प्रत्येक कार्यालयात असलेल्या पाण्याच्या टाक्या व नळाच्या तोट्या अस्वच्छ असल्यामुळे येथील कर्मचार्‍यांना बाटलीबंद पाण्याचा आधार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात स्वच्छ भारत अभियान सुरू केले. लोकांचा सहभाग, त्याला सरकारचा हातभार असे या अभियानाचे स्वरूप आहे. अभियान अधिक गतिमान होण्याची गरज असल्यामुळे या अभियानाला प्रारंभापासूनच शासकीय लेबल चिटकली, जिल्ह्यातील बर्‍याच शासकीय कार्यालयात अधिकार्‍यांनी फोटो काढून हे अभियान सुरू केले; मात्र स्वच्छ अभियान बुलडाणा शहरात शासनाच्या दिव्याखाली अंधार ठरत आहे. अनेक ठिकाणी फोटोपुरते अभियान राबविले गेले. दुसर्‍या दिवशी परिस्थिती जैसे थे दिसत आहे.
आपल्या विविध कामांसाठी जिल्ह्याभरातून नागरिक शासकीय कार्यालयात येतात. शासकीय कार्यालयात परिसरात पसरलेल्या अस्वच्छतेमुळे श्‍वास गुदमरतो. तर येथे पिण्याच्या पाण्याची अपुरी व्यवस्था आणि अस्वच्छ असल्यामुळे त्यांना पाण्यासाठी इतरत्र भटकंती करावी लाग त आहे. शिवाय कार्यालयातील कर्मचारी, अधिकार्‍यांनाही या कृत्रिम पाणी टंचाईचा त्रास सोसावा लागत आहे. यावर उपाय म्हणून प्रत्येक कार्यालयात कर्मचार्‍यांनी वैयक्तिक खर्चा तून पाण्याची व्यवस्था केली असल्याचे आढळून आले.

Web Title: Water from the government office is dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.